23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडायुझी- धनश्रीचे बिनसले?

युझी- धनश्रीचे बिनसले?

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांमध्येही काहीतरी बिनसले असल्याचेही बोलले जात आहे.

एकेकाळी आपल्या रोमँटिक फोटोंनी लोकांचे लक्ष वेधून घेणा-या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे.
युजवेंद्र आणि धनश्रीच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर स्टार पत्नीने तिच्या पतीचे आडनाव ‘चहल’ इन्स्टाग्रामवरून काढून टाकले आहे. आता तिने फक्त तिच्या नावाप्रमाणे ‘धनश्री वर्मा’ असे सोशल मीडियावर लिहिलेले दिसते आहे.

या दोघांमधील नात्याच्या चर्चेला तोंड फुटलं जेव्हा युझवेंद्रने एक इन्स्टा स्टोरी शेअर केल्यानंतर हे सर्व घडले. त्याने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर लिहिले होते, ‘न्यू लाईफ लोडींग’.

युझवेंद्र आणि धनश्री यांनी यांच्या या सोशल मीडियावर पोस्ट आणि बदलामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं गेलंय. मात्र अद्याप दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

२२ डिसेंबर २०२० रोजी, युझवेंद्र आणि धनश्री यांनी त्यांच्या संबंधित इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. दरम्यान चाहते या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असण्याबाबत प्रार्थना करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या