25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाअटितटीच्या सामन्यात झिम्बाब्वेचा ३ धावांनी निसरटता पराभव

अटितटीच्या सामन्यात झिम्बाब्वेचा ३ धावांनी निसरटता पराभव

एकमत ऑनलाईन

पर्थ : टी- २० विश्वचषकात भारत- पाकिस्तान दरम्यान खेळल्या गेलेल्या दुस-या सामन्यासारखा थरारक क्षण रविवारी क्रिकेट प्रेमींनी अनुभवला.

झिम्बाब्वे आणि बांग्लादेश दरम्यानच्या सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला १६ धावांची गरज होती. संघाने ११ धावाही जमावल्या. पण शेवटच्या दोन चेंडूत २ विकेट पडल्या आणि झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला.

बांग्लादेशचा यष्टिरक्षक नुरुल हसन याने यष्टीपुढे चेंडू झेलला आणि झिम्बाब्वेच्या फलंदाजाला यष्टीचित केले म्हणून पंचांनी शेवटच्या चेंडूला नो-बॉल दिला. पण, तरीही झिम्बाब्वेचा पराभव झाला. मोस्डॅकनेही शेवटचा चेंडू सोडला आणि एकही धाव घेता न आल्याने झिम्बाब्वेचा ३ धावांनी निसटता पराभव झाला.

प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने २० षटकांत ७ बाद १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ केवळ १४७ धावाच करू शकला. बांग्लादेशकडून नजमुल हुसेन शांतोने (७१) धावांची खेळी करीत बांग्लादेशाचे पारडे जड केले. अफिफ हुसैनने २९, तर शाकिब अल हसनने २३ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत मुजरबानी आणि नागरवा यांनी प्रत्येकी बळी घेतले.

झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सनेही ७१ धावांचे योगदान देत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण तरीही अन्य फलंदाजांनी निराशा केली.

असा गडगडला झिम्बाब्वेचा डाव

पहिल्या षटकाचा तिसरा चेंडू बॅटचा एज घेत नुरुलच्या हातात पोहोचला. तस्किनला पहिली विकेट मिळाली. तस्किनने त्याच्या पुढच्याच षटकात कर्णधार क्रेग एर्विनला नुरुलकरवी झेलबाद केले.
६ व्या षटकात मुश्तफिझूरने शुम्बाला शकीबकरवी झेलबाद केले. त्याच षटकातील ५व्या चेंडूवर मुश्तफिझूरने सिकंदर रझाला बाद केले. सिकंदरला पुल करायचे होते. मात्र स्क्वेअर लेगवर अफिफकरवी झेलबाद झाला.

शांतोचे अर्धशतक
बांग्लादेशला सुरुवातीलाच दोन झटके बसल्यानंतर नजमुल हुसेन शांतोने संघर्षपूर्ण खेळी केली. त्याने शकील अल हसनसोबत ५४ धावांची भागीदारी केली. त्याने ५४ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या