31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्रीडा धोनीसह जाहिरातीत झळकली झिवा

धोनीसह जाहिरातीत झळकली झिवा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेत महेंद्रसिंग धोनीपेक्षा जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेले फारसे खेळाडू नाहीत. धोनीने २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. पण तरीदेखील त्याचा जाहिरातविश्वातील दबदबा कमी झालेला नाही. त्यातच आता एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी धोनीसह त्याची लेक झिवा हिलाही अभिनयाची संधी मिळाली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच झिवाला आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत बाबा धोनी आणि लेक झिवा हे दोघेही दिसत आहेत.

झिवा अवघ्या पाच वर्षांची आहे. पण झिवाचा फार मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर झिवाचे एक अकाऊंट आहे. या सोशल मीडिया साईटवर तिचे १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिच्या अकाऊंटवरून तिचे स्वत:चे आणि धोनी-साक्षीसोबतचे फोटो पोस्ट केले जातात. या फोटो आणि व्हीडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असतात. नव्या वर्षात झिवा पुढचं पाऊल टाकत एका प्रसिद्ध उत्पादनाच्या जाहिरातीत झळकली आहे. ओरियो या चॉकलेट क्रीम बिस्किटाच्या जाहिरातीत धोनी आणि झिवा मस्ती करताना दिसत आहेत.

दरम्यान, ‘सेलिब्रिटीनेटवर्थ’च्या माहितीनुसार सध्या धोनीचे मूल्य १७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे. धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग नसला तरी आयपीएल मध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळताना तो एका हंगामाचे १५ कोटी रुपये कमावतो. गेल्या काही महिन्यांत धोनीने शेती करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.

रेखा जरे प्रकरणी सूत्रधार बोठेला संरक्षण कोण देतंय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या