दुष्काळात कोट्यवधींच्या जाहिरातींची उधळपट्टी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळ आणि सरकारच्या कारभारावर बोलताना त्यांनी ताशेरे ओढले, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे झाली म्हणून दुष्काळी महाराष्ट्रात शेकडो कोटी रुपयांच्या सरकारी जाहिरातींचे रकानेच्या रकाने छापून आणले जात आहेत. दुष्काळात होरपळणा-या गरीब शेतक-यांच्या खात्यात थेट मदत देण्याऐवजी जाहिरातींवर ४०० ते ५०० कोटी रुपये उधळले जात आहेत. हुकूमशहाला चमचेगिरी आवडते आणि सध्या केवळ एकतर्फी लाचारी व चमचेगिरी सुरू असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दिल्लीतील खासदारांचे आंदोलन, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात सरकारकडून होणारी जाहिरातबाजी, एमपीएससी व आदिवासी विद्यार्थ्यांची दडपशाही आणि सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या रोखठोक प्रश्नांवर संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर तोफ डागली.

दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या मोर्चावर बोलताना संजय राऊत म्हणाले, पावणेतीनशे खासदारांना निवडणूक आयोगाच्या ‘निर्वाचन सदन’ मुख्यालयाकडे जाताना रस्त्यावर बॅरिकेड्स आणि सशस्त्र दल उभे करून रोखण्यात आले. लोकप्रतिनिधींना मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटू न देणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? रात्री महिला खासदारांशी पोलिसांनी अत्यंत गैरवर्तन केले आणि रात्री साडेअकरा वाजता राहुल गांधींची सुटका झाली. जगासमोर भारताच्या लोकशाहीची ही विदारक स्थिती समोर गेली आहे.

ज्ञानेश कुमार आणि मोदी-शाहांच्या संगनमताने हा खेळ सुरू आहे. एवढा मोठा उद्रेक देशात सुरू असताना गृहमंत्री अमित शाह कुठे भूमिगत झाले आहेत आणि पंतप्रधान का मौन बाळगून आहेत? हा लढा आता मागे हटणार नाही; राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन दिल्लीसह देशभर तीव्र केले जाईल.

विद्यार्थ्यांच्या अंगावर लाठ्या
पुण्यातील स्पर्धा परीक्षांचे आंदोलन आणि मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या मध्यरात्रीच्या कारवाईवर ते म्हणाले, नाशिकहून पायी चालत मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सरकारी विश्रामगृह, आमदार निवास किंवा हॉटेल्समध्ये जागा दिली नाही. ते बिचारे विश्वासाने काँग्रेसच्या टिळक भवनात राहिले, तर तिथे पोलिसांनी मध्यरात्री घुसून विद्यार्थिनींना फरफटत बाहेर काढले आणि मुंबईच्या वेशीबाहेर नेऊन सोडले. सरकारला गरीब आदिवासींच्या घामाचा आणि कष्टाचा वास सहन होत नाही का?

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news