एसटी महामंडळाला मिळणार ‘आयपीएस’ कवच

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदावर अखेर आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिका-याची नियुक्ती होणार आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला लवकरच एक अनुभवी आणि शिस्तप्रिय नेतृत्त्व मिळणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या हादरवून टाकणा-या घटनेनंतर एसटीच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या होत्या. या घटनेनंतर, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात एसटीला आयपीएस दर्जाचा अधिकारी देण्याचे ठाम आश्वासन दिले होते.

गृहखात्याचा हिरवा कंदील
मंत्री महोदयांच्या याच आश्वासनाची पूर्तता आता प्रत्यक्षात येत आहे. एसटी महामंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला राज्याच्या गृह खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. सोबतच, मुख्यमंत्र्यांनीही या महत्त्वाच्या नियुक्तीस मान्यता दिल्याने, एसटीच्या सुरक्षा विभागाला लवकरच आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय होणार फायदा?
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे एसटीच्या प्रवाशांचा सुरक्षेवरील विश्वास आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, महामंडळाच्या अंतर्गत कामकाजातील शिस्त आणि कार्यक्षमतेला नवी धार मिळणार असल्याने, संपूर्ण एसटी महामंडळात सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news