ऐन सणासुदीत एसटी कर्मचा-यांचा आंदोलनाचा पवित्रा

मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येत्या २८ सप्टेंबरपासून आंदोलन करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेतन, भत्ते, ७ वा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा २८ सप्टेंबरपासून आक्रमक आंदोलन आणि १ ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत. तर कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत आहेत. २८ सप्टेंबरपासून ‘आक्रमक आंदोलन’ सुरू होणार असून १ ऑक्टोबरपासून मुंबईतील परिवहन मंडळाच्या मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर उद्भवणा-या परिस्थितीची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा संघटनेने दिला.

संघटनेच्या प्रमुख मागण्या
– २००६ पासून शासन कर्मचा-यांप्रमाणे वेतन लागू करावे.
– २०१६ पासून थकीत घरभाडे, भत्ते आणि महागाई भत्ता द्यावा.
– ७ वा वेतन आयोग लागू करावा.
– दिवाळी बोनस २०,००० रुपये द्यावा.
– आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना ८.५ लाख रुपयांची मदत द्यावी.
– संप काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
– रिक्त पदांवर नवीन भरती करावी.
– खासगी बस घेऊ नयेत, राप महामंडळाच्या स्वत:च्या बस वापराव्यात.
– महागाई भत्ता राज्य कर्मचा-यांप्रमाणे ४३% ऐवजी द्यावा.
– २०१५ पासून जी प्रवास भाडेवाढ झाली आहे त्याची पूर्वलक्षीपणे पूर्तता करावी.
– सेवानिवृत्त कर्मचा-यांना एक रकमी लाभ द्यावा.
– राप कर्मचा-यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत सोडवणूक न झाल्याने आक्रमक आंदोलन होणार.
– स्थावर मालमत्तेचा मुद्दा
– महामंडळाची स्थावर मालमत्ता उद्योगयोग्यतेच्या धर्तीवर चालवावी किंवा शासनात विलीन करावी, अशी मोठी मागणी संघटनांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31
Video thumbnail
Pandharpur Accident|पंढरपूर-म्हसवड महामार्गावर भीषण दुर्घटना;पिकअप विहिरीत कोसळून14 भाविकांचा मृत्यू
01:45
Video thumbnail
Nagesh Ashtikar ON Opration Tiger|आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबतच - नागेश आष्टीकर #marathilivenews
02:34
Video thumbnail
Latur News|स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर? प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था
02:56
Video thumbnail
Latur News|रविवारीही मनपा खुली; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासन धावले
03:36
Video thumbnail
Latur Accident|लातूर जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच; बुधोडा जवळ भीषण धडक, 3 ठार 17 जखमी
01:14
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17

Latest news