बार्शी : कासेगाव (ता. पंढरपूर) येथील पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या मातंग समह्याजातील महादेव वाघमारे यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामह्यावून घ्यावे, त्यांच्या कुटूंबियांना २५ लाख रुपये भरपाई द्यावी आणि संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी बार्शी शहरातील मातंग समाजाने एसटी स्टँड चौकात रस्ता रोको केले.
अन्याय विरोधी आंदोलन या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांनी दलितांवरील अत्याचार थांबवा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी चांदणे यांच्या नेतृत्वाखाली एसटी स्टँड चौकात दलित महासंघ, मातंग एकता आंदोलन, लहुजी शक्ती सेना, भारतीय दलित पॅन्थर इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, माजी नगरसेवक अमोल चव्हाण, श्रीधर कांबळे, अलीपूरचे माजी सरपंच सुरेश कसबे, बालाजी गायकवाड, संदीप आलाट, संगीतराव शिंदे, निलेश खुडे, पप्पू हनुमंते, आनंद चांदणे, कुणाल खंदारे, भास्कर बगाडे आदी उपस्थित होते.
यावेळी नवनाथ चांदणे, म्हणाले, राज्यात इतर कुठेही मातंग समाजासह इतर दलित समाजांवर पोलीस प्रशासन किंवा प्रशासनाकडून अत्याचार होता कामा नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी दास पवार, बालाजी गायकवाड, संदीप आलाट, सुनील अवघडे, पप्पू हनुमंते यांचीही भाषणे झाली.