बेताल वक्तव्य करणा-यांना आवरा

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यातील वातावरण पेटलं असून त्याचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी पवार गटामध्ये मोठी नाराजी आहे, प्रचंड आक्रोश आहे, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला अशी टीका करणे योग्य नाही, बेताल वक्तव्य करणा-यांना आवरा असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितल्याचे समजते. गोपीचंद पडळकरांवरील कारवाईबाबात शरद पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती आहे

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रचंड नाराजी आहे, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

पवार गटांत संताप
पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे, ते एकमेकांवर टीकाही करत असतात, पण पडळकर यांनी टीका करताना अतिशय खालच्या थराची भाषा वापरली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते, कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला. त्यांच्या आमदारांनी केलेल्या कृतीचा शरद पवारांनी निषेध व्यक्त केला. ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ती काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली. अशा वाचाळवीरांना, खालच्या पद्धतीने टीका करणा-यांना आवरा असेही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news