24.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeपरभणीविद्यार्थ्यांनी जाणून घेतले बँकेचे कामकाज

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले बँकेचे कामकाज

मानवत : सहकारी बँकिंगमधील संचालक मंडळाचे कामकाज, कर्ज प्रक्रिया, विविध प्रकारच्या सेवा, ऑडिट तपासणी, सभासदांचे हक्क व त्यांना मिळणारे लाभ अशा नागरी सहकारी बँकांचेचे कामकाज विद्यार्थ्यांनी नुकतेच जाणून घेतले. येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या शाखेला जैन कॉम्पुटर विद्यार्थ्यांनी दि.४ रोजी भेट देऊन बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली. या भेटीच्या वेळी बँकेचे कामकाज, अधिकारी व कर्मचा-यांची धावपळ, ठेवीदार व खातेदारांशी होणार संवाद समजून घेण्यात विद्यार्थी रमले.

साईबाबा नागरी बँक शाखा मानवत व जैन कॉम्पुटर द्वारे संयुक्तपणे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे व्यक्तीमत्व विकास व सगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी बँकेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. शाखा अधिकारी पठाण निसार व जैन कॉम्पुटरचे संचालक उदय परभणकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. प्रास्ताविक व्यवस्थापक निसार पठाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदम प्रवीण, अशोक मगर, लाडाने अजित, करवलकर हेमंत, गोकुळ पारखे यांनी प्रयत्न केले.

बँकेचे मु. का. अधिकारी रामराव लाडाने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बँकींग कामकाजाची माहिती दिली. लोकांचा पैसा सुरक्षित ठेवून त्याचा परतावा ठेवीदारांना देणे, तसेच पात्र लोकांना वित्तपुरवठा करून अर्थकारणाला चालना देणे अशी कामे बँकेमार्फत प्रामुख्याने होतात. बँकिंग हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असून भरभक्कम आर्थिक स्थिती व चांगला कारभार करण-या बँका राष्ट्राच्या आर्थिक संपन्नतेत योगदान देत असतात असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कोअर बँकिंग प्रणाली, नेट बँकिंग, डिजीटल बँकिंग, मोबाईल बँकिंग कामकाजांची माहिती देत बँकेच्या विविध सुविधांविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले. विद्यार्थ्यांनी बँकेच्या कार्यपद्धतीविषयी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. सूत्रसंचालन उदय परभणकर, आभार श्रेया पिंपळे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR