विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, भौगोलिक स्थळांना दिल्या भेटी

जिंतूर : शहरातील विद्या व्हॅली इंग्रजी शाळेची दहा दिवसीय सहल संपन्न झाली. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक स्थळांना भेटी देऊन त्यांच्या ज्ञानात भर टाकली. शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रिया देशमुख, मुख्याध्यापिका रजिया पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर प्रत्यक्ष नैसर्गिक अनुभव यावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी शैक्षणिक सहल २१ ते ३० नोव्हेंबर असे दहा दिवस नेण्यात आली. या सहलीत विद्यार्थ्यांनी ईस्त्रो बेंगलोर व हिंदुस्तान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेड या देशाच्या स्वायत्त संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम रुजविण्यात आले. तसेच भारताचे महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे हाऊस ऑफ कलाम या घराला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी चार धामपैकी एक धाम रामेश्वरम या ठिकाणी देखील भेट दिली.

तसेच भारताच्या दोन्ही बाजूंनी असणा-या अरब सागर व हिंद महासागर ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे धनुष कोडी येथेही भेट दिली. रामसेतूला, कन्याकुमारी, स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलला, मीनाक्षी मंदिर मदुराई याठिकाणी भेट देवून माहिती करून घेतली. भौगोलिक स्थळांमध्ये विद्यार्थ्यांनी तामिळनाडूमधील प्रसिध्द हिल स्टेशन कोडे कॅनल या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचार मनसोक्त आनंद लुटला. दि.३० नोव्हेंबर रोजी सहल परत आली. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी ४ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास केला आहे.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news