अपघातग्रस्त विद्यार्थिनीला सुनेत्रा पवारांची तत्पर मदत; ताफा थांबवून रुग्णालयात दाखल केले

बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस करत रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोची धडक बसली. धडकेनंतर ती वाहनासह रस्त्यावर पडून जखमी झाली होती. त्याचवेळी विकासकामांच्या पाहणीसाठी जाणारा सुनेत्रा पवार यांचा ताफा तेथून जात होता. अपघाताचे दृश्य दिसताच त्यांनी त्वरित गाडी थांबवून घटनास्थळी धाव घेतली.

सुनेत्रा पवार यांनी जखमी विद्यार्थिनीच्या प्रकृतीबाबत जाणून घेत संबंधित अधिकारी आणि सहका-यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्वत: रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपले स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनाही रुग्णालयात पाठवत उपचारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याची ही कृती पाहून अनेकांना दिवंगत अजितदादा पवार यांच्या जनसंपर्काची आणि संवेदनशील कार्यशैलीची आठवण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. अजितदादांनी जपलेला लोकाभिमुख वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे पुढे नेत असल्याची भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवली.

दरम्यान, बुधवारी अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर गोजुबावी येथील त्या धावपट्टीवर जाऊनही त्यांनी श्रद्धांजली वाहिली, जिथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अजितदादा पवार यांचे निधन झाले होते. त्याच दिवशी त्यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत, ‘दादा, तुमचा वाढदिवस आज जयंती म्हणून साजरा करावा लागत आहे, हे सत्य अजूनही मन स्वीकारायला तयार नाही’, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news