सियापेक्षा क्रूर निघाली सुनिता, पतीचे केले ३ तुकडे

 नवी मुंबई : प्रतिनिधी
ऐरोलीत एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. तिने पतीचे तीन तुकडे करत विविध ठिकाणी फेकून दिले होते. तिने तब्बल अकरा महिने हा खून पचवला होता. मात्र आता अखेर तिचे बिंग फुटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात केतन अग्रवाल खून प्रकरण गाजत आहे. अशातच केतनची होणारी पत्नी सिया गोयलने आपला प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करून केतनला लोहगडावरून धक्का देऊन मारल्याचे तपासातून समोर आले आहे. हे प्रकरण ताजे असताना आता नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातून धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत बलीराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादव नगर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध जुळले होते. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी रचला होता. हा कट यशस्वी करण्यासाठी सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी मावशीकडे पाठवले.

त्यानंतर ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री बलीराम गाढ झोपेत असताना सुनिता आणि राहुल यांनी प्रथम त्यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच बलीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. त्यांनी मुंडके, धड आणि पाय कापून तिन्ही तुकडे वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

हत्येनंतर सुनिताने यादव नगरमधील आपले घर भाड्याने देऊन मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे वास्तव्यास सुरुवात केली. जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत चौकशी केली. तेव्हा सुनिताने भांडण करून घर सोडून गेला, असं सांगून वेळ मारून नेली. मात्र संशय वाढल्याने त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता सुनिता व तिच्या प्रियकरानेबलीराम कुशवाह यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

सुनिता कुशवाह (४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (३०) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर बलीराम सूर्यनाथ कुशवाह (५०) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news