संजय राऊतांना १७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबाबत सोशल मीडियावर त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. आता त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणात पत्रकार निखिल वागळे यांनाही न्यायालयाने उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, वागळे यांना पुढील सुनावणीला ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाचा संबंध केवळ संबंधित व्यक्तींशी नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेशी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. भारतीय सर्वोच्च न्यायालयाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या विधानांमुळे न्यायालयाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यासाठी भारताच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी लेखी संमती दिली होती.

निखिल वागळेंनी मागितली बिनशर्त माफी
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिल्यानंतर निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्र्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागितली आणि संबंधित पोस्ट हटवली. मात्र, पोस्ट हटवण्यासाठी पाच दिवसांचा विलंब झाल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. वागळे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बाजू मांडली. वागळे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केलेले नाही आणि त्यांना आपल्या विधानाचा पश्चात्ताप आहे, असे त्यांनी सांगितले. वागळे मुंबईत राहत असल्याने त्यांना ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. गरज पडल्यास भविष्यात त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते.

संजय राऊतांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार
सुनावणीदरम्यान संजय राऊत यांच्या बाजूने कोणताही वकील उपस्थित नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. राऊत यांनी न्यायाधीश राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि मुख्यमंत्र्यांकडून आयोजित मेजवान्यांना जातात, असे आरोप केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्यायाधीशांबाबत लंडनमधील बॅडमिंटन खेळाच्या कथित फोटोंचा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भातील काही दावे खोटे असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटल्याचा उल्लेखही याचिकेत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news