27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

वाल्मिक कराडचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

कराडच्या मुलाने केली फेसबुक पोस्ट

नवी दिल्ली/बीड : बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत आले असून खटला सुरू असून याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह ५ जण अटकेत असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. तर आरोपींनी जामीनासाठी अर्ज केल्यानंतर आधी सत्र न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील वाल्मिकचा जामीन फेटाळला आहे.

कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार मात्र, काही दिवसांपूर्वीच तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वाल्मिकने सातत्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर, वाल्मिकच्या मुलाने फेसबुक पोस्ट केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या मुलाने फेसबुक पोस्ट करत लक्ष वेधले आहे. आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार… अशा आशयाची पोस्ट सुशील कराडने केली आहे. त्यामुळे, हत्याप्रकरणाबाबत आता वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड नेमके काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आज त्याच्या मुलाने केलेली ही फेसबुक पोस्ट चर्चेर्त आहे. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरण किंवा महादेव मुंडे प्रकरण, नेमके कोणत्या गुन्ह्याबाबत वाल्मिकचा मुलगा बोलणार हे लवकरच स्पष्ट होईल.

महादेव मुंडे हत्याप्रकरणी
नार्को टेस्टचा अहवाल हाती
बीड जिल्ह्याच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातही मोठी अपडेट समोर आली असून नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती आला आहे. याप्रकरणी, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं सत्य बाहेर येणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालातून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या हाती आलेला नार्को टेस्टचा रिपोर्ट न्यायालयाच्या समोर उघडला जाणार आहे. त्यामुळे, नार्को टेस्टच्या अहवालामध्ये नेमकी काय माहिती, याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR