24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeराष्ट्रीयसर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक

सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक

सगळे व्हीडीओ गायब

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आल्याची घटना घडली. न्यायालयात झालेल्या सुनावणीचे व्हीडीओ गायब झाले असून एका क्रिप्टोकरन्सीची जाहिरात दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल असून त्यावर सुनावणीचे व्हीडीओही अपलोड केले जातात. मात्र, अज्ञाताकडून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तंत्रज्ञान विभागाचे रजिस्टारकडून याबद्दल माहिती देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा एकही व्हीडीओ यूट्यूब चॅनलवर दिसत नाही. एक व्हीडीओ प्ले होत असून तो क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातीचा आहे. रिप्पल असे असे नाव दिसत असून, ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस : रिप्पल रिस्पॉन्ड्स टू द एसईसी २ बिलियन डॉलर फाईन. एक्सआरपी प्राइस प्रेडिक्शन’ सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंठपीठासमोर खटल्यांची सुनावण्यांचे या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR