तामीळनाडू सरकार डीएमकेच्या दयेवर

चेन्नई : तामीळनाडू सरकार द्रमुकच्या (डीएमके) दयेवर चालले असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा द्रमुकचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केला आहे. डीएमकेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्टॅलिन यांनी तमिळगा वेत्री कळहम पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री विजय यांच्यावरही हल्ला चढवला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निलाकांना राजकीय लाट नाही तर सिनेमाची त्सुनामी असे म्हटले.

मतदार केवळ आपल्या आवडत्या अभिनेत्याने नवा पक्ष काढला या उत्साहापोटी वाहून गेले. त्यांनी उमेदवारांच्या राजकीय परिपक्वतेवर नाही, तर अभिनेत्याच्या लोकप्रियतेवर मतदान केले आहे, असेही स्टॅलिन म्हणाले. लोकांनी उत्साहाच्या भरात मतदान केले आहे. पण अवघ्या काही दिवसांतच त्यांचा या खेळण्यातील रस संपेल. ज्याप्रमाणे एखादे लहान मूल सरतेशेवटी आपल्या आईला शोधते, त्याचप्रमाणे तामिळनाडूची जनता पुन्हा एकदा डीएमकेचाच शोध घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांवरही स्टॅलिन यांनी परखड भाष्य केले. कम्युनिस्ट पक्ष, विदुथलाई चिरुथाईगल कात्ची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांसारख्या पक्षांनी सुरुवातीला टीव्हीके सरकारला केवळ बाहेरून पाठिंबा दिला होता, मात्र नंतर ते थेट कॅबिनेटमध्ये सामील झाले, असे स्टॅलिन म्हणाले. तसेच आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. पण हे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार नाही हे नक्की, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तमिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी बहुमतासाठी ११८ जागांची गरज असते. मात्र विजय यांच्या टीव्हीके पक्षाला केवळ १०८ जागा मिळवता आल्या. काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांच्या कुबड्या घेऊन हे सरकार स्थापन झाले. यावरही स्टॅलिन यांनी प्रश्न उपस्थित केला. टीव्हीकेला स्वत:च्या बळावर बहुमतही सिद्ध करता आलेले नाही. आज हे सरकार केवळ आमच्या दयेवर टिकून आहे. हे सरकार कधीही आणि कोणत्याही दिवशी कोसळू शकते, असा इशारा त्यांनी दिला. तसेच अण्णाद्रमुकला फोडण्याचे प्रयत्न झाले, परंतु ते अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48

Latest news