‘चिप मेकिंग’साठी टाटाची १६ कंपन्यांसोबत हातमिळवणी

नवी दिल्ली : आजच्या काळात ज्याच्याकडे चिप म्हणजेच सेमीकंडक्टर आहे, जग त्याच्याच मुठीत आहे. स्मार्टफोनपासून ते फायटर जेटपर्यंत, सर्व काही याच छोट्याशा चिपवर अवलंबून आहे. या ग्लोबल रेसमध्ये भारत आता झपाट्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा देशाच्या भविष्याचा प्रश्न असतो, तेव्हा टाटा समूह कसा मागे राहू शकतो? सेमीकॉन इंडिया २०२६ च्या व्यासपीठावरून टाटा इलेक्ट्रॉनिक्सने एक महत्त्वाची घोषणा केली, ज्याने संपूर्ण जगाच्या टेक बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे.

टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ रणधीर ठाकूर यांनी सांगितले की कंपनी या इव्हेंटमध्ये एकूण १६ मोठे करार करत आहे. यात युरोप, जपान, सिंगापूर, मलेशिया आणि अमेरिकेच्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. युरोपमधून नेक्सपेरिया आणि बेसी, जपानमधून जेएसआर आणि फुजीफिल्म, मलेशियामधून कॉलिंग्टनसारख्या ग्लोबल कंपन्यांसोबतच भारताच्या एलअँडटी आणि गति शक्ती विश्वविद्यालयासोबतही टाटाने हातमिळवणी केली आहे.

म्हणजेच चिप बनवण्याच्या संपूर्ण सप्लाय चेनची व्यवस्था टाटाने केली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त कागदपत्रांवर स्वाक्ष-या होत आहेत, तर असं नाही. रणधीर ठाकूर यांनी स्पष्ट केलं की गुजरातमधील धोलेरामध्ये बनत असलेली त्यांची सेमीकंडक्टर फॅब म्हणजेच चिप बनवण्याची फॅक्टरी आणि आसाममध्ये बनत असलेली पॅकेजिंग फॅसिलिटीचं काम अगदी बुलेट ट्रेनच्या वेगानं सुरू आहे. सरकारला जी टाइमलाइन देण्यात आली होती, काम अगदी त्याच निश्चित वेळेवर पूर्ण होत आहे. धोलेरामध्ये ही फॅक्टरी उभी करण्यासाठी बांधकामापासून ते केमिकलपर्यंतच्या ४५० हून अधिक पार्टनर्सना एकत्र आणण्यात आले आहे.

नोक-यात महिलांचे वर्चस्व असेल
कंपनीने आतापर्यंत १.५ लाखांहून अधिक थेट रोजगार निर्माण केले आहेत. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे या वर्कफोर्समध्ये ६५ टक्के महिला आहेत, ज्यांपैकी बहुतांश देशातील दुर्गम गावांतून येतात. सीईओंचं म्हणणे आहे की सेमीकंडक्टर क्षेत्रात निर्माण होणारी एक नोकरी, इकोसिस्टममध्ये १० नवीन नोक-या निर्माण करते.

भारताची इलेक्ट्रॉनिक्स झेप
टाटाच्या सीईओंनी भारताच्या प्रगतीचं जे रिपोर्ट कार्ड सादर केले, तेही जबरदस्त आहे. २०१४ मध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री केवळ २ लाख कोटी रुपयांची होती, जी आता २०२६ मध्ये १३ लाख कोटी रुपयांपार पोहोचली आहे. फक्त पाच वर्षांपूर्वी इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू झाले होते आणि आज देशात १२ फॅक्टरी वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहेत. भारत आता फक्त चिप मागवत नाही, तर मेड इन इंडिया चिप जगभरातील ग्राहकांना निर्यात करत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news