23.2 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी

बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिजाऊ गुरुकुल वसतीगृहातील खासगी शिक्षकाने या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना दि. २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आई, वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला परभणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बोरी येथील कौसडी रोडवरील जिजाऊ गुरुकुल येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीवर शिक्षकाने फुस लावून अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या आई वडिलांना ही घटना सांगितली. पीडित मुलीचे आई-वडील यांच्या समक्ष मुलीच्या फिर्यादीवरून बोरी पोलिस ठाण्यामध्ये घटनेची माहिती देऊन आरोपी अशोक रंगनाथ ढगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीला बोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन परभणी येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपनीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR