28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(सी-टीईटी)देणा-या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून सूट

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(सी-टीईटी)देणा-या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून सूट

मुंबई : प्रतिनिधी
‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणा-या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिका-यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिका-यांना निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार देशातील सर्व कार्यरत शिक्षकांनी निश्चित कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी अर्ज केलेले आहेत. ही परीक्षा ७ व ८ फेब्रुवारीला होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

नवीन कार्यक्रमानुसार आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तारखा बदलल्याने परीक्षा देणा-या शिक्षकांची अडचण झाली होती. इलेक्शन ड्युटी लागल्यास परीक्षेला जायचे कसे असा प्रश्न शिक्षकांसमोर होता. परंतु राज्य निवडणूक आयोगाने त्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देऊन त्यांची सुटका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR