दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेत सुपर ४ फेरीतील दुस-या आणि एकूण १४ व्या सामन्यात पाकिस्तानने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टीम इंडियासमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाच्या मेहरबानीमुळे २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, शुबमन गिल आणि शिवम दुबे या चौघांनी कॅच सोडल्या. पाकिस्तानने या संधीचा फायदा घेतला.
भारताने केलेल्या अशा गचाळ फिल्डिंगमुळे पाकिस्तानला १७१ धावा करता आल्या. आता टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत विजयी चौकार लगावणार की पाकिस्तान गेल्या पराभवाची परतफेड करणार?
















