25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी

टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी

रांची : विराट कोहलीचे वनडेतील विक्रमी शतक रोहित शर्मा आणि कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत कुलदीप यावदसह हर्षित राणाने दाखवली धमक याच्या जोरावर भारतीय संघाने रांचीचं मैदान मारलं आहे. पहिल्या वनडेतील दिमाखदार विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रांचीच्या मैदानात टॉस महत्त्वपूर्ण होता. हा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला. पण टॉस गमावल्यामुळे बॅटिंगसह बॉलिंगमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत टीम इंडियाने बाजी मारली.

लोकेश राहुलनं टॉस गमावल्यामुळे भारतीय संघावर या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी फिरल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची दमदार खेळी त्यानंतर लोकेश राहुलसह रवींद्र जडेजाने फलंदाजीत केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३४९ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर ३५० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. हर्षित राणाने यात पुढाकार घेतला. नव्या चेंडूवर त्याने तीन विकेट्स घेत टॉस गमावलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाला फ्रंटफूटवर आणले.

अर्धा संघ तंबूत परतल्यावर मार्को यान्सेन आणि मॅथ्यू ब्रीट्झके या जोडीनं सामन्यात ट्विस्ट आणला. पण कुलदीपनं या दोघांचा खेळ खल्लास करत भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मैदानात दव असल्यामुळे गोलंदाजी करणं मुश्किल होते. याचा फायदा घेत सेट झालेला कॉर्बिन बॉशही मॅच दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं वळवू शकला असता. पण अर्शदीपनं ४९ व्या षटकात अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आणि अखेरच्या षटकात प्रसिद्ध कृष्णानं घेतलेली शेवटची विकेटसह भारतीय संघाने मालिकेत विजयी सलामी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR