19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeतंत्रज्ञानमार्क झुकरबर्ग यांना दणका

मार्क झुकरबर्ग यांना दणका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल ३ मध्ये असलेल्या मार्क झुकरबर्ग यांच्या अडचणी वाढत आहेत. रशियाने इंस्टाग्राम आणि फेसबुकची मुख्य कंपनी असलेल्या मेटाला दहशतवादी आणि कट्टरवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे. रशियाने मार्च महिन्यातच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर निर्बंध घातले होते.

रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केला. तेव्हा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून रशियाच्याविरोधात अपप्रचार होत असल्याचा आरोपकरीत रशियाने फेसबूकवर बंदी घातली होती. रशियात इंस्टाग्राम हे लोकप्रिय आहे. जाहिराती आणि विक्रीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग होता.

फेसबुकला आता टिकटॉक यूट्यूब सारख्या प्लेटफॉर्म्सकडून टक्कर मिळत आहे. १८ वर्ष जुन्या या कंपनीचे युझर्स टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत. यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. याचा फटका मेटाचे सीईओ झुकरबर्ग यांच्या संपत्तीत घट झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या