29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeतंत्रज्ञान७३ ट्विटर हँडल, ४ यूट्यूब चॅनेल ब्लॉक

७३ ट्विटर हँडल, ४ यूट्यूब चॅनेल ब्लॉक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने मंगळवारी जोरदार कारवाई करत ७३ ट्विटर हँडल आणि ४ यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. बनावट मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित प्रक्षोभक साहित्य प्रकाशित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तक्रार केल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही सरकारने मोठ्या प्रमाणात यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार मंत्रालयाने ७३ ट्विटर हँडल, चार यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवरील एका गेमवर कारवाई केली आहे. ही हँडल पाकिस्तानशी जोडलेली असल्याचे म्हटले आहे. प्रक्षोभक व्हिडिओची माहिती सर्वप्रथम चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली होती, जिथे एका वापरकर्त्याने त्यांना पंतप्रधानांविषयी अत्यंत हिंसक व्हिडिओवर कारवाईची विनंती केली होती. त्यावर मंत्र्यांनी त्यांना याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर याविषयावर कार्य करणा-या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ट्विटर, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर बनावट/दाहक कंटेट शेअर करण्याचा प्रयत्न करणारी हँडल ब्लॉक केली आहेत आणि त्यांच्या मालकांची ओळख पटली आहे, असे सांगण्यात येत आहे.

तीन आठवड्यांपूर्वीही कारवाई
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन आठवड्यांपूर्वीही अशी कारवाई केली होती. तेव्हाही गुप्तचर संस्थांसोबत समन्वयित प्रयत्नात २० यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन भारतविरोधी प्रचार केला जात होता. चॅनेल आणि वेबसाइट पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या नेटवर्कशी संबंधित आहेत आणि भारताशी संबंधित विविध संवेदनशील विषयांबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत, असे सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या