26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home तंत्रज्ञान देशात २०२१ मध्ये ५ जी नेटवर्क कनेक्शन

देशात २०२१ मध्ये ५ जी नेटवर्क कनेक्शन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्री झपाट्याने पुढे जात आहे. आता कालांतराने ४ जी देखील मागे पडेल, अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली आहे. किंबहुना २०२१ पर्यंत भारतीय ५ जी कनेक्शनचा आनंद घेऊ शकतात. पुढील वर्षी जर स्पेक्ट्रम लिलावास सुरुवात झाली तर भारतात २०२१ मध्ये पहिले ५ जी कनेक्शन मिळू शकते, असा दावा एरिक्सन या टेलिकॉम कंपनीने त्यांच्या एका अहवालात केला आहे.

जगात २०२६ पर्यंत ५जी कनेक्शनची संख्या ३.५ अब्जांपर्यंत पोहोचेल, तर भारतात ही सेवा वापरणा-यांची संख्या ३५ कोटी असेल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत एरिक्सन नेटवर्क सोल्यूशनचे प्रमुख (दक्षिण-पूर्व अशिया, ओशियाना आणि भारत) नितीन बन्सल म्हणाले, की स्पेक्ट्रम लिलावास जर पुढील वर्षी सुरुवात झाली तर भारतात २०२१ मध्ये पहिले ५जी कनेक्शन मिळू शकते. २०२० मधील एरिक्सन मोबिलिटी अहवालानुसार, जगभरातील एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के म्हणजेच एक अब्ज नागरिकांपर्यंत ५जी कनेक्शन पोहोचलेले असेल.

देशातील २७ टक्के लोकांचा असेल समावेश
अहवालानुसार, २०२६ पर्यंत जगभरातील एकूण लोकसंख्यÞेच्या तुलनेत ६० टक्के लोकांना ५ जी सेवा उपलब्ध होईल. त्यावेळी ही सेवा वापरणा-या ग्राहकांचा आकडा ३.५ अब्ज होईल, अशी अपेक्षा आहे. याच वेळी भारतात ५जी सेवा वापरणा-या ग्राहकांचा आकडा ३५ कोटींवर असेल. हे प्रमाण एकूण मोबाईल वापरणा-यांच्या तुलनेत २७ टक्के असेल.

भारताला मिळू शकते पहिले ५जी कनेक्शन
बन्सल म्हणाले, की ५ जी सेवांसाठी लिलावाकरिता जाहीर केलेल्या अंतिम मुदतीनुसार २०२१ मध्ये भारताला पहिले ५जी कनेक्शन मिळू शकते. भारतात स्मार्टफोन वापरणारी एक व्यक्ती प्रति महिना सरासरी १५.७ जीबी इंटरनेटचा वापर करते. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. २०२० मध्ये भारतात ४ जी तंत्रज्ञानाचे वर्चस्व होते. एकूण मोबाईल वापरकर्त्यांपैकी ६३ टक्के ग्राहक हे ४ जीचा वापर करतात. २०२६ पर्यंत ३ जी सेवा बंद होईल, अशी शक्यता आहे, असे बन्सल यांनी स्पष्ट केले.

देशात स्मार्टफोनचे ७६ कोटी वापरकर्ते
२०२० मध्ये भारतात स्मार्टफोन सब्सक्रिप्शनमध्ये वाढ होऊन ते ७६ कोटीपर्यंत पोहोचले आहे. २०२६ पर्यंत ते ७ टक्क्यांच्या सीजीआरवरुन सुमारे १.२ अब्जांपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे. कमी दराने मोबाईल ब्रॉडबँड सेवा, स्वस्त स्मार्टफोन आणि अधिकाधिक लोकांचा ऑनलाईनकडे असलेला कल यामुळे मासिक यूजेसमध्ये वाढ होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप नको

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या