34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeतंत्रज्ञान१५ वर्षांच्या मुलाने बनविले व्हॉटस्अ‍ॅपच्या तोडीचे अ‍ॅप

१५ वर्षांच्या मुलाने बनविले व्हॉटस्अ‍ॅपच्या तोडीचे अ‍ॅप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्हॉट्सऍपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सऍपच्या नव्या पॉलिसीमुळे सुरक्षिततेवरून युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी व्हॉट्सऍपसारख्या इतर मेसेसिंग ऍपकडे आपला मोर्चा वळवळा असून त्याचा वापर करणे सुरू केले आहे. याच दरम्यान एका १५ वर्षीय मुलाने कमाल केली आहे. व्हॉट्सऍपच्या तोडीचे एक नवे भारतीय ऍप तयार केले आहे. हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यातील नववीमध्ये शिकणा-या हार्दिक कुमार दिवान या विद्यार्थ्याने हे ऍप तयार केले आहे.

हार्दिकने बीटल नावाने ऍप तयार केले असून, हे एक चॅटिंग मोबाईल ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये उपलब्ध असून, यामध्ये व्हॉट्सऍपच्या तोडीचे सर्व फीचर्स आहेत. बीटल ऍपचा व्हॉट्सऍपप्रमाणे व्यावसायिक कामासाठी उपयोग करता येऊ शकतो, असा दावा हार्दिकने केला आहे. तसेच यामध्ये चॅटिंग आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत. डेटा सुरक्षेच्या सर्व गोष्टींची खबरदारी यामध्ये घेण्यात आली आहे अशी माहिती त्याने दिली आहे.

हॅकर्सनी व्हॉट्सऍप अकाऊंटचा ऍक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचे व्हॉट्सऍप रन करू शकतात. स्कॅमचा, फसवणुकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाऊसनेही केला होता. त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात. व्हॉट्सऍप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुस-या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकते.

कसे बनविले अ‍ॅप?
हार्दिकने लॉकडाऊनमध्ये कुकिंग संबंधीचे व्हीडीओ यूट्यूबवर तयार करण्यास सुरुवात केली आहे. काही व्हीडीओ बनवल्यानंतर त्याला कॉम्पुटरमध्ये आवड निर्माण झाली. त्याने ऑनलाईन कोडिंग क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्यामधूनच बीटल या चॅटिंग ऍप तयार करण्याची सुरुवात झाली. हार्दिकने जवळपास तीन महिने या ऍपच्या कोडिंगवर काम केले आहे. त्यानंतर ते गुगल प्ले स्टोरवर नोंदवण्यात आले. यामध्ये हळूहळू अपडेट केले जात असून, लवकरच ते आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. हार्दिकला भविष्यात सायबर क्राईम एक्सपर्ट वकील व्हायचे आहे.

हॅकिंगपासून व्हॉट्सऍप युजर्सला अलर्ट
व्हॉट्सऍपसंबंधित नवनवीन माहिती ही समोर येत आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सऍप युजर्सला अलर्ट केले आहे़ व्हॉट्सऍप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचे व्हॉट्सऍप अकाऊंट हॅक होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

गलवानचे हिरो कॅप्टन सोइबा यांचा सन्मान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या