25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeतंत्रज्ञानअटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप बंद

अटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गोपनीय धोरणांत बदल करण्याच्या भूमिकेवरून वापरकर्त्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्सपने पुन्हा एकदा आपलेच घोडे पुढे दामटले आहे. वापरकर्त्यांना पसंत असो वा नसो गोपनीय धोरणातील बदल त्यांना स्वीकारावेच लागतील. त्यास जे वापरकर्ते सहमती दर्शवणार नाहीत, त्यांना त्यांचा रस्ता मोकळा असल्याचे व्हॉट्सपने अप्रत्यक्षरीत्या सुचवले आहे.

व्हॉट्सपने जानेवारी महिन्यात नवीन गोपनीय धोरण ‘प्रायव्हसी पॉलिसी’ची घोषणा केली होती. १५ मेपासून ज्याची अंमलबजावणी होणार आहे. युझर्सना व्हॉट्सपला व्यक्तिगत माहिती संकलित करण्याची परवानगी देणे बंधनकारक असणार आहे. व्हॉट्सप ही व्यक्तिगत माहिती तिची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकला देणार आहे. या माहितीचा वापर फेसबुक व्यवसाय वृद्धीसाठी करणार असून पॉलिसीचा स्वीकार न केल्यास त्यांना ठराविक कालावधीनंतर तुमच्या अकाउंटवर बंदी घालण्यात येईल.

दरम्यान, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपची कानउघाडणी केली आहे़ मात्र तरीदेखील व्हॉट्सअ‍ॅप आपल्या गोपनीय धोरणांत कोणताही प्रकारचा बदल करणार नसल्याचे म्हटल्याने आता सरकार आणि वापरकर्ते यावर काय निर्णय आणि तोडगा काढतात, यावर देशातील वापरकर्त्यांचे लक्ष लागले आहे़

जनजागृती करणार
युझर्सचे अकाऊंट काही आठवडे सुरू राहील. कॉल्स आणि नोटिफिकेशन्स त्यांना येत राहतील. मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत. युझर्सना कालांतराने व्हॉट्सप अकाऊंट वापरता येणार नाही. व्हॉट्सपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात जनजागृती करण्यासाठी दोन आठवड्यांत कॅम्पेनिंग सुरू करणार आहे.

बदल अद्याप गुलदस्त्यात
व्हॉट्सप चॅट विंडोवर युझर्सना एक छोटा बॅनर दिसेल. त्यावर धोरणात काय बदल होणार आहे आणि वापरकर्त्यांची किती माहिती व्हॉट्सअ‍ॅप संकलित करणार आहे, याचा तपशील दिलेला असेल. वापरकर्त्यांना बॅनरवरील तपशील वाचण्यासाठी ‘टॅप टू रिव्ह्यू’ या आॅप्शनवर क्लिक करावे लागेल. धोरणातील अटी व शर्ती स्वीकारण्याची वारंवार वापरकर्त्यांना आठवण करून दिली जाईल.

माहेरच्यांना संपत्तीचा वारस नेमण्याचा हिंदू महिलांना अधिकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या