23.2 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeतंत्रज्ञानतक्रार अधिकारी नेमण्यासाठी अल्टिमेटम

तक्रार अधिकारी नेमण्यासाठी अल्टिमेटम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणा-या ट्विटर इंडियावर दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती मंगळवार दि़ ६ जुलै रोजी चांगलेच भडकले. त्याचबरोबर अल्टिमेटम देताना ट्विटरने नव्या नियमांनुसार स्थानिक तक्रार निवारण अधिका-याची नियुक्ती कधी होईल? याबाबत ८ जुलैपर्यंत माहिती द्यावी, असा इशाराही दिला आहे.

ट्विटरने यापूर्वी हायकोर्टाला सांगितले होते की, कंपनीकडून स्थानिक तक्रार निवारण अधिका-याच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, न्या. रेखा पल्ली यांनी यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, कोर्टाला याची माहिती देण्यात आली नव्हती की स्थानिक तक्रार निवार अधिका-याची यापूर्वी नियुक्ती केवळ हंगामी तत्वावर करण्यात आली होती. तसेच या अधिका-याने आता राजीनामाही दिला आहे.

हंगामी अधिका-याची झाली होती नियुक्ती
हायकोर्टने एका प्रकरणात सुनावणी करताना दावा केला होता की, मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर केंद्राच्या सूचना आणि माहिती मंत्रालयाच्या नव्या नियमांचे पालन करत नाही. यावेळी ट्विटरच्यावतीने वरिष्ठ वकिल साजन पूवैया यांनी म्हटले की, सोशल मीडियावरील दिग्गज कंपनी असलेली ट्विटर इंडिया नव्या आयटी अ‍ॅक्ट २०२१ नुसार तक्रार निवार अधिका-याची अद्याप नियुक्ती करु शकलेली नाही. यासाठी एक हंगामी तक्रार निवारण अधिका-याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, २१ जून रोजी त्याला हटवण्यात आले होते़

ट्विटरला दोन दिवसांचा अवधी
कोर्टाने त्यांना दोन दिवसाचा अवधी देताना म्हटले की, ट्विटर इंडियाने आठ जुलैपर्यंत नवा तक्रार निवारण अधिकाºयाची नियुक्ती कधी होईल़ याबाबत कोर्टाला कळवावे. त्याचदिवशी याप्रकरणाची पुढील सुनावणी होईल. तसेच कोर्टाने वरिष्ठ अधिवक्त्यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यावेळी तुम्ही स्पष्ट माहितीसह यावे अन्यथा आपल्या अडचणीत वाढ होईल.

दहशतवाद्यांपेक्षा गांधी परिवारामुळे जास्त नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या