न्युयॉर्क : गेल्या महिन्याभरात फेसबुकची कमी झालेली युजरची संख्या, मार्क झुकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत तसेच शेअरमध्ये झालेली घट या पार्श्वभूमीवर फेसबुकमध्ये लवकरच काही नव्या उपाययोजना पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. अखेर मार्क झुकरबर्गने फेसबुकच्या कर्मचा-यांचे नाव मेटामेट्स केले आहे. तसेच कंपनीचे ब्रीदवाक्य देखील बदलून टाकले आहे.
काही महिन्यांपूर्वीच फेसबुकच्या मूळ कंपनीचे नामकरण ‘मेटा’ असे केले होते. त्यानंतरचा हा दुसरा मोठा बदल आहे. ज्या प्रकारे गुगल आपल्या कर्मचा-यांना गुगलर्स म्हणते, मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचा-यांना मायक्रोसॉफ्टीज म्हणते तसेच मेटाच्या कर्मचा-यांना ‘मेटामेट्स’ म्हटले जाईल, असे झुकरबर्गने जाहीर केले आहे.