24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उद्योगजगत ‘अ‍ॅपल’ची निर्मिती भारतातून ?

‘अ‍ॅपल’ची निर्मिती भारतातून ?

फॉक्सकॉनची भारतात १ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची योजना

एकमत ऑनलाईन

बीजिंग : आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुस-या देशांमध्ये शिफ्ट करत आहे. अ‍ॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु आहे तसेच करोना व्हायरसचे संकट यामुळे अ‍ॅपल चीनमधून आपले उत्पादन, व्यवसाय हळूहळू दुसºया देशांमध्ये हलवत आहे. अ‍ॅपलने आपल्या क्लायंटसना चीनमधील उत्पादन प्रकल्प दुसºया ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे.

ग्राहकांशी संबंधित असलेल्या विषयांवर आपण काहीही बोलणार नाही असे फॉक्सकॉनकडून सांगण्यात आले तर अ‍ॅपलने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अ‍ॅपलचा पेरुंबुदूर येथील कारखान्यामध्ये बनवला जातो. तिथे गुंतवणूक करण्याची फॉक्सकॉनची योजना आहे. सध्या फॉक्सकॉन आयफोनचे बहुतांश मॉडेल्स चीनमध्ये बनवते. श्री पेरुंबुदूर येथील प्रकल्पाचा विस्तार झाल्यास सहा हजार नोक-यांची निर्मिती होऊ शकते. आंध्र प्रदेशमध्येही फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे.
तिथे ते चीनच्या शाओमी कंपनीसाठी स्मार्टफोन बनवतात.

अ‍ॅप्सबंदीमुळे देशातील रोजगारात वाढ
भारतीय अ‍ॅपला वाढणारी मागणी यामुळे अ‍ॅप निर्मिती करणा-या कंपन्यांमधील कर्मचा-यांचे पगार देखील वाढले आहेत. मिड सिनिअर रोलसाठी ६० ते ७० लाखाचे पॅकेज दिले जात आहे तर इंजिनिअरसाठी १५ ते १८ लाख रुपयांचे पॅकेज दिले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीचा भारतीय अ‍ॅप निर्मिती करणाºया कंपन्यांना भरपुर फायदा झाला आहे. यामुळे नोकर भरती वाढली असून कर्मचाºयांचा पगार देखील वाढला आहे. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर बंदी घातली होती. या बंदीनंतर टिकटॉकच्या स्पर्धक अ‍ॅपला फायदा होत आहे.

तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार
कोरोना सारखे संकट असताना देखील या आर्थिक वर्षात कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा विचार अनेक कंपन्या करत आहेत. आता यामध्ये अ‍ॅपलचाही समावेश होणार असून देशातली सहा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने देशासाठी उत्तमच असल्याचे मत व्यक्त होत आहे़ यामुळे कर्मचा-यांची संख्या वाढवावी लागेल असे रिओ टीव्हीचे संस्थापक सक्षम केशरी म्हणाले , आम्ही या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्मचा-यांची संख्या १०० करणार असल्याचेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या