27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeतंत्रज्ञानट्विटरकडून तक्रार निवारण अधिका-यांची नियुक्ती

ट्विटरकडून तक्रार निवारण अधिका-यांची नियुक्ती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर नमते घेतले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आयटी नियमांचे पालन करत ट्विटरने भारतात तक्रार निवारण अधिका-यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. ट्विटरकडून विनय प्रकाश यांना भारतातील स्थानिक तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियु्क्त केले आहे.

ट्विटर वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, युजर्झ विनय प्रकाश यांच्याशी संपर्क करु शकतील. नव्या आयटी नियमांची घोषणा झाल्यापासून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद सुरु झाला होता. ट्विटरने नव्या आयटी नियमांचे पालन करण्यास सुरुवातीला नकार दिला होता आणि त्यानंतर टाळाटाळा सुरु केली होती. केंद्र सरकारने २० लाखांपेक्षा अधिक युजर्स असणा-या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना तीन अधिका-यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला होता. यात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी यांचा समावेश होता. हे तिन्ही अधिकारी भारताचे रहिवाशी असायला हवेत, अशी अटही केंद्र सरकारने घातली होती. ट्विटरने याआधी धर्मेंद्र चतूर यांची अंतरिम तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. पण, जून महिन्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.

न्यायालयाने सुनावले होते खडेबोल
दोन दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाला धारेवर धरतानाच कंपनीला अमेरिकेत नोंदणी असलेले शपथपत्र दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकारने तयार केलेले नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम ट्विटरने पाळणे गरजेचे असून, या प्लॅटफॉर्मला आम्ही कारवाईपासून कोणतेही संरक्षण देऊ शकत नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. नवे आयटी नियम ट्विटर पाळणार नसेल तर केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मोकळे असल्याचे खडेबोल न्यायालयाने सुनावले होते.

जानेवारीपासून ६९ वेळा इंधन दरवाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या