24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeतंत्रज्ञानट्विटरच्या अधिका-यांना केंद्राकडून नोटीस

ट्विटरच्या अधिका-यांना केंद्राकडून नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नवीन आयटी कायद्यावरून मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले ट्विटर आणि केंद्र सरकार आमनेसामने उभे ठाकलेले असतानाच संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या समितीने ट्विटरच्या अधिका-यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना येत्या शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले आहे.

संसदीय समितीने केवळ ट्विटरलाच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रोद्योगिकी मंत्रालयाच्या अधिका-यांनाही आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. संसदीय समितीच्या बैठकीत डिजिटल स्पेसमधील महिलांच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे. नवीन आयटी कायदा, त्यावर ट्विटरने घेतलेली भूमिका याबरोबरच इतर अनुषंगिक बाबींवर संसदीय समितीकडून ट्विटर अधिका-यांची झाडाझडती होऊ शकते.

संघर्ष निर्णायक टप्प्यावर
ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नवीन डिजिटल नियम त्वरित लागू करावेत अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा केंद्र सरकारने याआधीही मायक्रोब्लॉंिगग साइट ट्विटरला दिला होता.

राष्ट्रीय धोरणात घरोघरी लसीकरणाचा समावेश नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या