27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeतंत्रज्ञानट्विटरविरोधात दिल्लीत गुन्हा

ट्विटरविरोधात दिल्लीत गुन्हा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकाने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीचे पालन न केल्याने ट्विटरला असलेले कायदेविषयक संरक्षण हटवण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नुकताच भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता अजून एका प्रकरणात ट्विटरविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ट्विटरवरोधात चाईल्ड पॉर्नोग्राफिक मजकूर ट्विटरवर असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स अर्थात एनसीपीसीआरने यासंदर्भात ट्विटरविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सायबर सेलने ट्विटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोस्को (पीओसीएसओ) आणि आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. लहान मुलांच्या शोषणासंदर्भातील मजकूर किंवा लिंक ट्विटरवर असल्याचे हा गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आले. ट्विटर आयएनसी आणि ट्विटर इंडिया प्रा. लि. या दोन्हींच्या नावे गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आली आहेत.

सुनावणी पुढे ढकलली!
दरम्यान, ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या याचिकेवरील सुनावणी ५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी मनिष माहेश्वरी यांना चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. याविरोधात मनिष माहेश्वरी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.

यूट्यूबने हटविले ९५ लाख व्हीडीओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या