39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeतंत्रज्ञानटीकटॉक ची घसरण

टीकटॉक ची घसरण

एकमत ऑनलाईन

​​लहान लहान व्हिडिओ साठी प्लॅटफॉर्म  प्रसिद्ध असलेल्या टीकटॉकचे प्ले स्टोअर वरील वापरकर्त्याचे रेटिंग अचानक १.६ इतके खाली आले आहे. काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर टिकटोकचे रेटिंग 4.7 होते आणि ते आता १.६ इतके घसरले आहे.  खरं  तर या घसरणीला यूट्यूब आणि टिकटॅक यांच्यात कोण चांगले आहे या प्रश्नापासून सुरुवात झाली. बरेच यूजर्स टीकटॉकला १ स्टार देत आहेत आणि भारतात यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

गूगल प्ले स्टोअरवरील टिकटॉक ऑफिशियल अ‍ॅपला  २४.४ दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना रेटिंग दिले आहे. यामध्ये सर्वाधिक १ स्टार  देणारे वापरकर्त्याच्या मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अ‍ॅपचे सध्याचे रेटिंग प्ले स्टोअरवर १.६ च्या जवळपास पोहोचले आहे. असेच राहिले तर टिकटॉकचे रेटिंग लवकरच एक पेक्षा देखील कमी होईल अशी शक्यता वर्तण्यात येत आहे. प्ले स्टोरवरचे टिक-टॉकचे रेटिंग एक पेक्षा कमी झाल्यास याचा टिक-टॉकला भारतात मोठा धक्का बसेल यात काहीच शंका नाही. गेल्या काही दिवसांत अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधून टिक-टॉक काढून टाकले आहे.

Read More  बॅंकाकडून अधिक व्याजदराच्या ठेव योजना

भारतीय चाहत्यांनी ठरवले तर ते एका दिवसात कोणालाही स्टार करू शकतात आणि एका दिवसात फ्लॉप. युट्युब आणि टिक-टॉकच्या सोशल मीडियावरील वॉरमध्ये अनके जणांनी आपला सपोर्ट युट्यूबला देत टिक-टॉक अ‍ॅप डिलीट केले होते. बर्‍याच इंटरनेट युजर्सनी व्हर्च्युअल वॉरमध्ये सामील होत टिक-टॉकवरच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.

खरं  तर या वॉरची सुरुवात आमिर सिद्दीकी या लोकप्रिय टिक टॉकरच्या व्हिडीओने झाली. आमिरने युट्यूबर्सची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त करत व आपला सपोर्ट  युट्यूबला  देत टिकटॉक ची रेटिंग कमी केली

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या