30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home तंत्रज्ञान तंत्रज्ञान शोधून काढले : बॅटरी एका चार्जिंगमध्ये कार १६०० किमी धावणार

तंत्रज्ञान शोधून काढले : बॅटरी एका चार्जिंगमध्ये कार १६०० किमी धावणार

एकमत ऑनलाईन

मुंबई आयआयटीने कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी : बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह  शोधून काढले तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी समस्यांमुळे केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या वाहनांची रेंज आणि किंमत मोठी अडचण आहे. तसेच चार्जिंग स्टेशनही जवळपास नाहीतच. अशा अनेक अडचणींमुळे इलेक्ट्रीक वाहनांचा काळ येण्यास मोठा अवधी जाणार आहे. मात्र, यावर आयआयटी मुंबई आणि शिव नादर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे की, एका चार्जिंगमध्ये ही बॅटरी असलेले वाहन तब्बल १६०० किमीचे अंतर कापणार आहे.

तंत्रज्ञान आयआयटीने विकसित केले
सध्या ह्युंदाईकडे १००० किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे १०० किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्या कार आहेत. टाटा नेक्स़ॉन ३०० किमीची रेंज देते. यापुढे काही अद्याप तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या बॅटरींमध्ये लिथिअम आयन वापरले जाते. यापेक्षा पर्यावरणाला अनुकुल असे लिथियम-सल्फरच्या बॅटरींचे उत्पादन घेतले जाऊ शकते. असे तंत्रज्ञान आयआयटीने विकसित केले आहे.

कृषी टाकाऊ वस्तू आदींच्या वापरातून बनविण्यात येऊ शकते
संशोधकांनी लिथिअम आयनच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा देणारी बॅटरी तयार केली आहे. ही लिथियम-सल्फर बॅटरी पेट्रोलियम रसायनची उत्पादने जसे की सल्फर, कृषी टाकाऊ वस्तू आदींच्या वापरातून बनविण्यात येऊ शकते.

बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह सुरक्षा व स्वच्छ स्रोत
शिव नादर विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक बिमलेश लोखब यांनी सांगितले की, हे संशोधन एक उपाय शोधण्यासाठी हरित रसायन विज्ञानाच्या सिद्धांताला केंद्रीत करते. याद्वारे बनविलेली बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह सुरक्षा व स्वच्छ स्रोत आहे.

एका चार्जिंगवर १६०० किमी अंतर कापेल
सध्याच्या काळात एखादी कार ४०० किमीचे अंतर एका चार्जिंगवर पार करत असेल तर या बॅटरीची कार एका चार्जिंगवर १६०० किमी अंतर कापेल. म्हणजेच ही कार एका चार्जिंगमध्ये मुंबई ते दिल्ली अंतर कापेल. या बॅटरीवर निश्चितच वाहन निर्मात्या कंपन्यांच्या उड्या पडणार आहेत. कारण सध्या कोणत्याही कंपनीकडे एवढी मोठी रेंज देणारे तंत्रज्ञान नाही. तसेच भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजाराची मागणी लक्षात घेता उद्या अशा प्रकारच्या बॅटरीलाच मोठी मागणी राहणार आहे.

विद्यापीठात साकारतोय अत्याधुनिक मिडीया स्टुडियो

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या