33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeतंत्रज्ञानफेसबुक, व्हॉटसअ‍ॅप ठप्प

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप ठप्प

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉटसऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झाले आहे. यामुळे वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत व्हॉट्सऍप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली. सर्व्हर डाऊन झाल्याने सोमवारी रात्री ९ च्या सुमारास जगभरात याचा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत या साईटस्चे व्यवहार ठप्प्पच होते. त्यामुळे युजर्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही ऍप चालत नाहीत. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही ऍप ठप्प आहेत. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षहून अधिक, व्हॉट्सऍपचे ५३० दशलक्षहून अधिक वापरकर्ते आहेत, तर इन्स्टाग्रामचे २१० दशलक्षहून अधिक वापरकर्ते आहेत. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची जगभरातील सेवा अचानक ठप्प झाली. त्यामुळे नेटक-यांचा हिरमोड झाला. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने ही समस्या उद्भवली. तथापि, यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात येताच फेसबुकच्या वेबसाईटवर यूजर्ससाठी थेट एक मॅसेजच लिहिला गेला. त्यात काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा येत आहे. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर समस्या दूर करू. असुविधेसाठी क्षमस्व, असे नमूद करण्यात आले आहे. ऐनवेळी या सोशल मीडियांचे सर्व्हर डाऊन झाल्याने वापरकर्त्यांची तारांबळ उडाली. यासोबतच व्हाईस कॉल, व्हीडीओ कॉल्सही चालत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हॉटसअ‍ॅपवरून टेक्स्ट मॅसेज पाठविणे किंवा स्वीकारणे होत नाही. या अगोदर १९ मार्च २०२१ रोजीही व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्रामची सेवा जवळपास ४० मिनिटे डाऊन झाली होती. त्यावेळीही याचा जगभरातील युजर्सना फटका बसला होता.

कारण अस्पष्ट
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे अकाउंट सुरू झाले का, याची तपासणी करत होते. भारतात युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम झाला. दरम्यान, यामध्ये आधून मधून तांत्रिक बिघाड होणारच, ते अपेक्षित असते. त्यामुळे हे गृहित धरून चालावे लागते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या