21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeतंत्रज्ञानफेसबुक देणार अकाऊंटवरील कारवाईचा रिपोर्ट

फेसबुक देणार अकाऊंटवरील कारवाईचा रिपोर्ट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मंगळवार दि़ २९ जून रोजी स्पष्ट केले, की आयटीच्या नवीन नियमांतर्गत प्रथम अंतरिम अहवाल हा २ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या रिपोर्टमध्ये १५ मे ते १५ जून दरम्यान फेसबुकवरून किती आपत्तीजनक माहिती (कंटेट) हटविण्यात आली, याबद्दल माहिती देणार आहे. त्याचा अहवाल १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल, ज्यामध्ये फेसबुक कडून युजर्सकडून किती तक्रारी आल्या, त्यापैकी किती तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे हे सांगण्यात येणार आहे.

२६ मे रोजी देशभरात नवीन आयटी नियम लागू करण्यात आले आहेत, त्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्यात तक्रारींचे रिपोर्ट सादर करावे लागणार आहेत. यात तक्रारी आणि त्यांचे निराकरण याविषयी माहिती असेल. तसेच या रिपोर्टमध्ये फेसबुकवरून काढून टाकलेल्या पोस्टची लिंक माहिती म्हणून नोंदविली जाईल.

चुकीचा कंटेट ३६ तासांत काढला जाईल
नवे आयटी नियम हे डिजिटल प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावे लागतात. तसेच, तक्रारींच्या लिंक्स तपासणीनंतर हटवावे लागतात. कंटेट ३६ तासांच्या आत हटविणे आवश्यक आहे. तसेच अश्लील कंटेट २४ तासांच्या आत काढावे लागेल.

ड्रोन हल्ल्याचा तपास एनआयएकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या