21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeतंत्रज्ञानभारतात अधिकारी पाठविण्यास फेसबुकची टाळाटाळ

भारतात अधिकारी पाठविण्यास फेसबुकची टाळाटाळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे कायदे पालन करण्यास नकार देणा-या परदेशातील सोशल मीडिया कंपन्यांत आता फेसबुकचीही भर पडली आहे. फेसबुकला संसदेच्या माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीने पाचारण केले असता या कंपनीने कोरोनाचे कारण दाखवून समितीचा हा निर्देश मानण्यासच साफ नकार दिला. कोरोनाच्या काळात आम्ही कोणत्याही अधिका-यांना भारतात बंदिस्त जागेवरील बैठकीत पाठविण्याचा धोका पत्करू शकत नाही, असे फेसबुकने कळविल्यावर समितीनेही कडक पवित्रा घेतला आहे.

काही झाले तरी आम्ही आमचे अधिकारी सध्याच्या काळात भारतीय संसदीय समितीसमोर पाठविणार नाही, असे फेसबुकने कळविल्यावर यावरून वातावरण तापले आहे. शुक्रवारी समितीने ट्विटरच्या अधिका-यांना कडक इशारा दिला होता. ट्विटरचे अधिकारी अखेर काल थरूर समितीसमोर आले तेव्हा त्यांना, या देशाचे कायदे महत्त्वाचे आहे. तुमच्या कंपनीचे धोरण नव्हे असे बजावण्यात आले. दरम्यान आता फेसबुकच्याही या पवित्र्यानंतर समितीने सक्त पवित्रा घेतला आहे. देशात सोशल मीडियाचा अनेक प्रकारे दुरुपयोग होत आहे, अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरणही कलुषित होत आहे व महिला सुरक्षेसाठी हे चिंताजनक ठरले आहे. त्यामुळे संसदीय समितीला यांची झाडाझडती घेणे आवश्यक बनल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

केंद्राच्या नियमांची पायमल्ली होतेय
अनेक सोशल मीडियावरून केंद्राच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा, पण त्यांना देशाचे कायदे पाळावेच लागतील असे समितीनेही स्पष्टपणे फेसबुकला कळविले आहे. फेसबुकच्या ताज्या उत्तरावर संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अधिका-यांना पाठविणे बंधनकारक
फेसबुकच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्यच आहे, असे समितीने बजावले आहे. संसदीय समितीची महत्त्वाची बैठक ऑनलाइन होऊ शकत नाही. संसदीय नियमांनुसार तसे वारंवार करणे अशक्य असल्याचे कळविण्यात आले असून फेसबुकला आपल्या अधिका-यांना पाठवावेच लागेल, असा इशारा दिला. जे अधिकारी समितीसमोर हजर होऊ शकतील त्यांची नावे-यादी कळवा, असेही समितीने फेसबुकला कळविले.

डॉक्टरांवर हल्ले केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या