23.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home तंत्रज्ञान नेटकऱ्यांपर्यंत पोहचलेला फोटो खरा की खोटा याची माहिती खुद्द गुगलच देणार

नेटकऱ्यांपर्यंत पोहचलेला फोटो खरा की खोटा याची माहिती खुद्द गुगलच देणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – आजवर आपल्या अनेक फोटो आले असतील पण त्याची सत्यता आपल्यापैकी कोणीच परखली नसेल, हा फोटो खरा आहे कि फोटोशॉप केलेला आहे. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील बरेचसे फोटो हे फोटोशॉप केलेले असतात, पण या फोटोमुळे कधी कधी आपण गोत्यात देखील येऊ शकतो. त्यामुळेच आता नेटकऱ्यांपर्यंत पोहचलेला फोटो हा खरा आहे की खोटा हे याची माहिती आता खुद्द गुगलच देणार आहे.

गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये केला बदल

गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये बदल केला असून आता गुगल सर्च केल्यानंतर इमेज थम्बनेलच्या खालीच फॅक्टचेकचे लेबल दिसणार आहे. जेव्हा गुगल सर्चच्या रिझल्टवर युझर्स टॅप करुन मोठ्या आकारामध्ये इमेज पाहतील तेव्हा त्यांना इमेजच्या फॅक्ट चेकसंदर्भातील माहिती वेब पेजवर दिसेल, अशी माहिती गुगल ग्रुप प्रोडक्टचे व्यवस्थापक हॅरीस कोहेन यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

‘क्लेमरिव्ह्यू’चा वापर करण्यात येणार आहे

गुगलने फोटोंच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी आपल्या सर्च आणि न्यूज पर्यायांमध्ये हे नवे फिचर आणले आहे. स्वतंत्र, अधिकृत माहिती स्त्रोतांकडून आलेल्या आणि गुगलच्या नियमांमध्ये बसणाऱ्या वेब पेजेसवरील फोटोंवर हे लेबल दिसणार आहे. फोटोंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ऑनलाइन प्रकाशक वापरतात त्या ‘क्लेमरिव्ह्यू’चा वापर करण्यात येणार आहे. युझर्सला ही माहिती सहज सापडावी म्हणून गुगलने आधीपासूनच फॅक्ट चेकची माहिती सर्चवर तसेच गुगल न्यूजमध्ये देण्यास सुरुवात केल्याचे आयएएनएस या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

उपक्रमांना ६.५ मिलियन डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा

क्लेम रिव्ह्यूच्या माध्यमातून युट्यूबवरही ब्राझील, अमेरिका आणि भारतामध्ये माहितीची पडताळणी केली जाते. गुगलच्या रँकिंगमध्ये या फॅक्ट चेक लेबलमुळे फरक पडणार नाही. गुगलची सिस्टीम सर्वात योग्य, विश्वासार्हता असणारी माहिती दाखवण्याचे काम करते. फॅक्ट चेकसंदर्भातील माहितीही या सिस्टीमच्या माध्यमातून पुरवली जाते, असे कोहेन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. फॅक्ट चेकर्सने सध्याच्या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये केलेल्या महत्वाच्या कामाची दखल घेत या वर्षाच्या सुरुवातीलाच गुगल न्यूज इनिशिएटीव्हने अशाप्रकारची खरी माहिती युझर्सपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणाऱ्या उपक्रमांना ६.५ मिलियन डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

Read More  ‘छोडेंगे नहीं जबतक तोडेंगे नहीं : १६ पूर्व, १२ मुख्य परीक्षेनंतर त्याला मिळाले नायब तहसीलदार पद

ताज्या बातम्या

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

सोयाबीन शेतक-यांच्या मुळावर

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : अनेक अडचणींचा सामना करत पिकविलेल्या सोयाबीनला शेवटी पावसाचा फटका बसल्याने बाधित सोयाबीनच्या पंचनामाच्या प्रतिक्षेतच शेतक-यांनी काढणीला सुरूवात केली आहे....

आणखीन बातम्या

रंग बदलणारा स्मार्टफोन येतोय!!!

नवी दिल्ली : रंग बदलणारा स्मार्टफोन सध्या काल्पनिक वाटेल. पण विवो अशाच स्मार्टफोनवर काम करत आहे. काही काळापूर्वी एक व्हिडिओ पाहिला गेला होता आणि...

गुगलला देणार टक्कर? Apple कंपनीही आता सर्च इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नात

न्ययॉर्क : गुगल आणि गुगलच्या सर्च इंजिन शिवाय सध्या जगाचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. Yahoo आणि Bingने काही काळ Googleशी स्पर्धा केली. मात्र...

तंत्रज्ञान शोधून काढले : बॅटरी एका चार्जिंगमध्ये कार १६०० किमी धावणार

मुंबई आयआयटीने कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी : बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह  शोधून काढले तंत्रज्ञान मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी...

सावधानतेचा इशारा : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे वाढले ब्लॅकमेलिंगचे प्रमाण

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणा-या राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करुन...

रियलमीचा सेल उद्यापासून

मुंबई : रियलमी च्या यूथ डेज सेलची घोषणेअंतर्गत रियलमी चा सेल 24 ऑगस्टपासून होत आहे, हा सेल 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सेलच्या दरम्यान...

गुगल मॅप्समध्ये आले नवीन अपडेट, जंगल-रस्त्यांची मिळणार अचूक माहिती

दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या गुगल मॅप्स साठी एक नवीन अपडेट जारी केले असून, या नवीन अपडेटमुळे आधीच्या तुलनेत व्हिज्युअल अधिक चांगले देण्यात आलेले...

फेसबुकमध्ये दिसेल टिकटॉक सारखे फीचर!

मुंबई, 18 ऑगस्ट : भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉक बॅन केल्यानंतर त्यासारखेच अनेक Apps समोर आले आहेत. फेसबुकने नुकतेच इन्स्टाग्रामवर रिल्स नावाचे फीचर लाँच केले...

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

मुंबई : लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून...

डोनाल्ड ट्रम्प यांचं फर्मान : 90 दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करा

अमेरिका : जगाला कोरोना नावाच्या महामारीच्या खाईत ढकलणाऱ्या चीनविरुद्ध असंतोष बळावत असल्याचं चित्र आहे. त्याचा फटका आधीच चिनी कंपन्या आणि अ‍ॅप्लिकेशनला बसला आहे. आता...

कॅमस्कॅनरच्या तोडीसतोड म्हणून मेड इन इंडिया फोटोस्टॅट हे अ‍ॅप आले

भारताने अनेक चीनी अ‍ॅप्स बंद केल्यानंतर भारतीय अ‍ॅप्सची चांदी झाली आहे. चीनी अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यावधीच्या घरात होती. हे अ‍ॅप बंद झाल्यानंतर...
1,254FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...