27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeक्राइमओटीपी शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे

ओटीपी शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना संसर्गाच्या संकटामुळे आॅनलाइन व्यवहार वाढत असताना सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी पोलिसांनी एक व्हिडीओ बनवून नागरिकांना सतर्क करण्यास सुरुवात केली आहे. बँक कधीही तुमची खासगी माहिती विचारत नाही, त्यामुळे ओटीपी शेअर करू नका, असा संदेश व्हिडीओद्वारे दिला जात आहे.

विलेपार्ले पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी हा व्हिडीओ तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ज्या बँकेत आपले खाते आहे़ त्याच बँकेतून बोलत असल्याचा आव आणत सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या बोलण्यात गुंतवून त्यानंतर खासगी माहिती, एटीएमचा पिन किंवा ओटीपी क्रमांक मागतात. यातील बºयाच आरोपींना कॉल सेंटरमधील कामाचा अनुभव असल्याने त्यांच्या बोलण्यात सामान्य नागरिक तसेच विशेषत: ज्येष्ठ नागरिक फसल्याची बरीच प्रकरणे आहेत.

त्यामुळे स्वत:च्या बँक खात्याची खासगी माहिती ज्यात ओटीपी, पिन क्रमांक यांचा समावेश आहे ती कधीच फोनवर उघड करू नका. कारण, बँक कधीच ग्राहकांचे खासगी डिटेल्स मागत नाही, ही बाब काणे यांनी व्हिडीओमार्फत स्पष्ट केली. हा व्हिडीओ सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याने महिला आणि वृद्ध यामुळे सतर्क राहून आपल्या बँक खात्याला रिकामे होण्यापासून वाचवू शकतील, असा विश्वास विलेपार्ले पोलिसांनी व्यक्त केला.

 

मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज, अरुण जेटलींचा मृत्यू? स्टॅलिन यांच्या आरोप; स्वराज, जेटली यांच्या मुलींने दिले उत्तर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या