26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeतंत्रज्ञानगोपनीय भूमिका स्वीकारली नाही तर सेवा मर्यादित होणार

गोपनीय भूमिका स्वीकारली नाही तर सेवा मर्यादित होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्हॉट्सऍप या इन्संटट मेसेसिंग सेवेच्या नव्या धोरणांचा (अटी व शर्ती) म्हणजेच पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सऍप युझर्सकडे अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. व्हॉट्सऍपची नवीन धोरणे १५ मेपासून लागू होणार आहेत. सध्या तरी कंपनीने युझर्सचे अकाउंट डिलीट करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कंपनीने त्याचवेळी जर या धोरणांचा स्वीकार केला नाही तर व्हॉट्सऍपची फंक्शनॅलिटी कमी होत जाईल असेही सांगितले आहे. म्हणजेच व्हॉट्सऍपच्या या धोरणांशी युझर्सने आय ऍग्रीचा पर्याय निवडत स्वीकार केला नाही तर काही सेवा युझर्सला वापरता येणार नाहीत. जाणून घेऊयात हा सर्व प्रकार नक्की आहे तरी काय?, आणि कोणत्या सेवांवर होणार आहे याचा परिणाम?

शुक्रवारी व्हॉट्सऍपने आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भातील धोरणांबद्दल खुलासा केला आहे. कंपनीकडून अनेकदा या नवीन धोरणांसंदर्भातील रिमांइडर पाठवला जात आहेत. मात्र १५ तारखेपर्यंत कंपनीची नवीन धोरणांना युझर्सने मान्यता दिली नाही तर काही फिचर्स त्यांना वापरता येणार नाही. धोरणांचा स्वीकार न करणा-या युझर्सचे अकाउंट्स लिमिटेड फक्शनॅलिटी मोडवर टाकण्यात येतील, असे कंपनीने म्हटले आहे.

युझर्सला आपल्या व्हॉट्सऍपवर चॅट लिस्ट पाहता येणार नाही. अर्थात समोरच्या युझर्सकडून त्यांना मेसेज येत राहतील मात्र ते केवळ नोटिफिकेशन माध्यमातून त्यांना वाचता येतील किंवा त्या मेसेजला उत्तर देता येईल. आता ज्या पद्धतीने स्क्रोल करुन संपूर्ण चॅट लिस्ट पाहता येते ती सेवा बंद केली जाईल. धोरणांचा स्वीकार न करणा-या युझर्सला येणारे ऑडिओ आणि व्हीडीओ कॉल स्वीकारता येतील. मात्र १५ मेनंतरही धोरणांचा स्वीकार न करणा-यांना ऑडिओ आणि व्हीडीओ कॉल करता येतील की नाही यासंदर्भात कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

मर्यादित सेवा देणार मात्र नोटीफिकेशन येणार
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सऍपने १५ मे नंतरही ही धोरणे न स्वीकारणा-यांना यासंदर्भातील नोटीफिकेशन पाठवले जातील असेही कंपनीने म्हटले आहे. व्हॉट्सऍपने यापूर्वी जे लोक या मुदतीत अटी व शर्ती स्वीकारणार नाहीत त्यांची अकाउंट बंद केली जातील असे म्हटले होते़

काही दिवसांपूर्वीच केलेला खुलासा
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सऍपने इमेल मेसेजमध्ये अकाउंट बंद केली जाणार नाहीत असे म्हटले आहे. १५ मेपर्यंत जरी कुणी अटी व शर्ती स्वीकारलेल्या नाहीत, तरी त्यांची अकाउंट काढून टाकली जाणार नाहीत. भारतातील कुणाचेही व्हॉट्सऍप वापरणे बंद करण्यात येणार नाही. पुढील अनेक आठवडे अटी व शर्ती स्वीकारण्यासाठी युझर्सला मेसेज येत राहतील.

काय आहे नवीन धोरणांमध्ये?
जेव्हा एखादी व्यक्ती व्यावसायिक गटांशी संपर्क साधतील तेव्हा ती माहिती विपणनासाठी फेसबुक वापरू शकेल असे सांगण्यात आले होते. व्हॉट्सऍपने नव्या अटी व शर्ती लागू केल्यानंतर अनेकांनी टेलीग्राम व सिग्नल या उपयोजनांना प्राधान्य दिले होते. या उपयोजनांची लोकप्रियता या काळात वाढली.

खरं काय, खोटं काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या