22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeतंत्रज्ञानTikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक डाऊनलोड

TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक डाऊनलोड

एकमत ऑनलाईन

टिकटॉकवर वाद सुरूच असतात. यूट्यूब विरुद्ध टिकटॉक हा वाद तर शिगेला पोहोचला असून अनेकांनी या चिनी अ‍ॅपचा बहिष्कार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे टिकटॉकचे गुगल प्ले स्टोअरवरील वरील रेटिंग देखील 2.9 वर पोहोचले आहे. अशात Mitron हे अ‍ॅप आले आहे. विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वी सुरू झालेले हे अ‍ॅप 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड देखील करण्यात आले आहे.

आता भारतीयांनी आपल्या देशातील अ‍ॅपला प्राधान्य देण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. Mitron अ‍ॅप IIT रुडकीचा विद्यार्थी असणाऱ्या शिवांक अग्रवालने विकसीत केले आहे. विशेष म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरील टॉप चार्टमध्ये पाचव्या स्थानावर Mitron हे अ‍ॅप आले आहे.

Read More  माहीच्या प्लॅनमुळे मुंबई इंडियन्स फायनल हारली!

या यादीमध्ये आरोग्य सेतू हे अ‍ॅप पहिल्या स्थानावर असून टिकटॉक दुसऱ्या स्थानावर तर व्हॉट्सअ‍ॅप तिसऱ्या आणि झूम चौथ्या स्थानावर आहेत. मात्र अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या मित्रों या भारतीय अ‍ॅपने पाचवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपचे रेटिंगही टिकटॉकपेक्षा जास्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात अनेकदा येत असल्यामुळे ‘मित्रो’ हा शब्द प्रसिद्ध असून हे अ‍ॅपच नाव असल्याचे यूजर्सला गंमतशीर वाटत आहे. याचे फीचर जवळपास टिकटॉक सारखेच आहेत. हे अ‍ॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवरच असून iOS वर अद्याप उपलब्ध नाहीये.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या