24.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home तंत्रज्ञान Jio चा दररोज 3 GB डेटाचा प्लॅन; दरदिवशी ३ जीबी डेटा देणारे...

Jio चा दररोज 3 GB डेटाचा प्लॅन; दरदिवशी ३ जीबी डेटा देणारे सध्या ३ रिचार्ज प्लॅन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : – देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. मात्र, तरीही वर्क फ्रॉम सुरु असून मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी जास्त प्रमाणात इंटरनेटची आवश्यकता असते. या सर्वांसाठी रिलायन्स जिओने दोन दिवसांमध्ये २ नवीन प्लॅन लाँच केले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा मिळतोय. डेटा शिवाय, या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी नॉन जिओ मिनिट मिळतात. रिलायन्स जिओकडे दरदिवशी ३ जीबी डेटा देणारे सध्या ३ रिचार्ज प्लॅन आहेत.

असा आहे जीओचा ३४९ रुपयांचा प्लॅन : रिलायन्स जिओच्या या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून, यामध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच यात एकूण ८४ जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री मिळते. इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच जिओ अँप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळतात. जर दिवसाचा हिशोब केला तर तुम्हाला १२.४६ रुपये खर्च येतो.

असा आहे जीओचा  ४०१ रुपयांचा प्लॅन : जिओच्या या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय रोज ३ जीबी डेटा ऐवजी या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा आणखी मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ९० जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळतो. तसेच प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३९९ रुपये किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. यात दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. जिओ ते जिओ कॉलिंग प्लॅनमध्ये फ्री आहे. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. प्लॅनमध्ये जिओ अँप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सस्क्रिप्शन मिळतात. जर दररोजचा हिशोब केल्यास तुम्हाला रोजच्या साठी १४.३२ रुपये खर्च करावे लागतील.

असा आहे जीओचा ९९९ रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून, या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये एकूण जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळते. देशभरात इतर कोणत्याही नेटवर्कवर नंबर कॉलसाठी या प्लॅनमध्ये ३ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच जिओ अँप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सस्क्रिप्शन मिळते. रोज ३ जीबीसाठी तुम्हाला दिवसाचा खर्च ११.३८ रुपये येतो.

Read More  ओढ्याच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून; शेतकरी पती-पत्नीही बेपत्ता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या