36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeतंत्रज्ञानमेड इन इंडिया अ‍ॅप हाईक बंद

मेड इन इंडिया अ‍ॅप हाईक बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी युझर्ससाठी बॅड न्यूज आहे. कारण हाईक अ‍ॅप आता बंद करण्यात आले आहे. हाईकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन भारती मित्तल यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. हाईक बंद झाल्याचा फटका कोट्यवधी युझर्सना बसणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हाईक अ‍ॅप बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. हाईकऐवजी नवीन प्रोडक्ट बाजारात आणत असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

अखेर हे अ‍ॅप आता अधिकृतपणे बंद झाले आहे. एवढेच नव्हे, तर गुगल प्ले स्टोरमधूनही हे अ‍ॅप हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप कोणीही डाऊनलोड करू शकणार नाही. युझर्सचा अ‍ॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित ठिकाणी स्टोअर करण्यासाठी कंपनीने मुदत दिली आहे. तसेच काही समस्या असल्यास १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत युझर्स कंपनीशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

मोहम्मद सिराजमुळे ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या