23.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home तंत्रज्ञान मायक्रोमॅक्स कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत

मायक्रोमॅक्स कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : मायक्रोमॅक्स कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही भारतीय कंपनी आपले तीन नवे स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. त्यामधील एक फोन प्रीमियम फिचर्ससह कमी किंमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय हा फोन दिसायला मोटोरोला स्मार्टफोन सारखा असणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या आगामी स्मार्टफोनबाबत कल्पना दिली आहे.

iOne Note हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स कंपनीने देशात लाँच केलेला अखेरचा फोन होता. या फोनची किंमत ८ हजार १९९ रूपये होती. परिणामी आता भारत-चीन वादानंतर भारत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मायक्रोमॅक्स कंपनी नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोमॅक्स कंपनी लवकरच त्यांचे स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. शिवाय या तीन फोनची किंमत १० हजार रूपयांच्या कमी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी फोन खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे.

मायक्रोमॅक्स कंपनी #MadeByIndian आणि #MadeForIndian या हॅशटॅगचा वापर करून पुन्हा नव्याने बाजारात उतरणार आहे. शिवाय ट्विटरवर यासाठी नेटकऱ्यांकडून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Read More  कसला बहिष्कार ? चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ मिनिटांमध्येच सोल्ड आउट

ताज्या बातम्या

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

सोयाबीन शेतक-यांच्या मुळावर

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : अनेक अडचणींचा सामना करत पिकविलेल्या सोयाबीनला शेवटी पावसाचा फटका बसल्याने बाधित सोयाबीनच्या पंचनामाच्या प्रतिक्षेतच शेतक-यांनी काढणीला सुरूवात केली आहे....

आणखीन बातम्या

रंग बदलणारा स्मार्टफोन येतोय!!!

नवी दिल्ली : रंग बदलणारा स्मार्टफोन सध्या काल्पनिक वाटेल. पण विवो अशाच स्मार्टफोनवर काम करत आहे. काही काळापूर्वी एक व्हिडिओ पाहिला गेला होता आणि...

गुगलला देणार टक्कर? Apple कंपनीही आता सर्च इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नात

न्ययॉर्क : गुगल आणि गुगलच्या सर्च इंजिन शिवाय सध्या जगाचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. Yahoo आणि Bingने काही काळ Googleशी स्पर्धा केली. मात्र...

तंत्रज्ञान शोधून काढले : बॅटरी एका चार्जिंगमध्ये कार १६०० किमी धावणार

मुंबई आयआयटीने कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी : बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह  शोधून काढले तंत्रज्ञान मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी...

सावधानतेचा इशारा : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे वाढले ब्लॅकमेलिंगचे प्रमाण

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणा-या राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करुन...

रियलमीचा सेल उद्यापासून

मुंबई : रियलमी च्या यूथ डेज सेलची घोषणेअंतर्गत रियलमी चा सेल 24 ऑगस्टपासून होत आहे, हा सेल 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सेलच्या दरम्यान...

गुगल मॅप्समध्ये आले नवीन अपडेट, जंगल-रस्त्यांची मिळणार अचूक माहिती

दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या गुगल मॅप्स साठी एक नवीन अपडेट जारी केले असून, या नवीन अपडेटमुळे आधीच्या तुलनेत व्हिज्युअल अधिक चांगले देण्यात आलेले...

फेसबुकमध्ये दिसेल टिकटॉक सारखे फीचर!

मुंबई, 18 ऑगस्ट : भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉक बॅन केल्यानंतर त्यासारखेच अनेक Apps समोर आले आहेत. फेसबुकने नुकतेच इन्स्टाग्रामवर रिल्स नावाचे फीचर लाँच केले...

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

मुंबई : लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून...

डोनाल्ड ट्रम्प यांचं फर्मान : 90 दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करा

अमेरिका : जगाला कोरोना नावाच्या महामारीच्या खाईत ढकलणाऱ्या चीनविरुद्ध असंतोष बळावत असल्याचं चित्र आहे. त्याचा फटका आधीच चिनी कंपन्या आणि अ‍ॅप्लिकेशनला बसला आहे. आता...

कॅमस्कॅनरच्या तोडीसतोड म्हणून मेड इन इंडिया फोटोस्टॅट हे अ‍ॅप आले

भारताने अनेक चीनी अ‍ॅप्स बंद केल्यानंतर भारतीय अ‍ॅप्सची चांदी झाली आहे. चीनी अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यावधीच्या घरात होती. हे अ‍ॅप बंद झाल्यानंतर...
1,254FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...