25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeतंत्रज्ञानफेसबुक डेटा लीकनंतर आता व्हॉटस्अ‍ॅप स्कॅम समोर

फेसबुक डेटा लीकनंतर आता व्हॉटस्अ‍ॅप स्कॅम समोर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लीक प्रकरणानंतर व्हॉट्सऍप स्कॅमचेही एक नवे प्रकरण समोर आले आहे. या नव्या स्कॅममध्ये हॅकर्स युजर्सच्या व्हॉटस्अ‍ॅप ओटीपीचा वापर करुन अकाउंट हॅक करतात. मागील वर्षी नोव्हेंबरमध्येही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले होते़ हॅकर्स युजर्सचे अकाउंट हॅक करुन सर्व ऍक्सेस ब्लॉक करतात. व्हॉट्सऍपचा हा स्कॅम ट्रॅक करणे सोपे नाही, कारण तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून कोणाचातरी वापर करुन तुमचा व्हॉट्सऍप ओटीपी हॅक केला जातो.

या नव्या व्हॉट्सऍप स्कॅममध्ये युजरला एक टेक्स्ट मेसेज रिसिव्ह होतो, ज्यात ओटीपी दिलेला असतो. हॅकर्स युजर्सच्या फ्रेंड लिस्टचा वापर करुन ओटीपी शेअर करण्यासाठी सांगतात. युजरने आपल्या मित्राला ओटीपी शेअर केल्यानंतर, हॅकर्स त्या कोडचा वापर करुन, युजरच्या स्मार्टफोनवरुन व्हॉट्सऍप लॉगआउट करतात आणि आपल्या डिव्हाईसमध्ये लॉक-इन करतात.

या स्कॅमपासून कसे वाचाल?
व्हॉट्सऍपच्या या नव्या स्कॅमपासून वाचण्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे ठरते. सर्वात आधी युजरने आपल्या त्या मित्राला कॉल करावा, ज्याने ओटीपीसाठी टेक्स्ट मेसेज पाठवला आहे आणि त्याच्याकडून खात्री करुन घ्या की ओटीपी त्याने पाठवला आहे की त्याच्या अकाउंटचा वापर करुन दुस-याने पाठवला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कधीही कोणाशीही तुमचा ओटीपी शेअर करू नका.

बनावट अ‍ॅपने हॅकिंग
या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार आयफोन युजर्सकडून बनावट व्हॉट्सऍप वर्जन टिक करुन घेऊन हॅकर्स खासगी माहिती चोरी करत होते. या बनावट व्हॉट्सऍप वर्जनसह हॅकर्स इटालियन सर्विलांस फर्म सीवाय गेट४ चे नाव समोर आले होते़ सायबर सिक्योरिटी फर्म सीटिझन अ‍ॅपने या बनावट व्हॉट्सऍप वर्जनद्वारे होणा-या हॅकिंगची माहिती मिळवली होती. सिक्योरिटी फर्मच्या दाव्यानुसार, हॅकर्स युजरला डिव्हाईसमध्ये एमडीएम फाईम इन्स्टॉल करुन टार्गेट करत होते.

लसीकरणात भारत जगात अव्वलस्थानी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या