38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeतंत्रज्ञानझूम डाऊन झाल्याने ऑनलाईन कामांचा फज्जा

झूम डाऊन झाल्याने ऑनलाईन कामांचा फज्जा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षणात सध्या झूम अ‍ॅप महत्त्वाची भूमिका बजावत असून, सोमवार दि़ २३ ऑगस्ट रोजी झूम डाऊन झाल्याने भारतासह जगातील अनेक यÞुजर्सना कनेक्ट करताना अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. तसेच घरून काम करणा-या कर्मचा-यांच्या ऑफिस मीटिंगदेखील ऑनलाइन होत आहेत.

ऑनलाइन मीटिंगसाठी सर्वाधिक वापर झूमचा केला जात आहे़ मात्र, आज झूम डाऊन झाल्याने अनेक युजर्सना कनेक्ट करताना अडचणी आल्या. झूम सध्या मोठ्या प्रमाणावर आउटेजचा सामना करत आहे. याचा जगातील अनेक भागांमध्ये व्हीडीओ कॉल, वेबिनार आणि ऑनलाइन शिक्षणावर परिणाम होत आहे. तर, या आउटेजचा सर्वात जास्त फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झूम डाऊन झाल्याने व्हीडीओ टेलीकॉन्फरन्ंिसग प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आऊटेज दुरूस्त करण्यास प्रारंभ
डाऊनडिटेक्टर या इंटरनेटवरील आऊटजेसचा ट्रॅक ठेवणा-या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार आज पहाटे ५ वाजतापासून झूम कनेक्ट होण्यास अडचणी येऊ लागल्या. जवळजवळ १५० जणांनी तक्रारी नोंदवल्या, अशी माहिती न्यूज डॉट कॉम या वेबसाइटने दिली. झूमकडून ऑस्ट्रेलियातील लोकांचे आऊटेज दुरुस्त करणे सुरू केले आहेत, मात्र अजूनही अनेक युजर्सला झूम कॉलशी कनेक्ट करण्यात समस्या येत आहेत.

चौकशी सुरू : झूम
लाइव्ह मीटिंगमध्ये सहभागी होताना युजरला येणा-या अडचणींची आम्हाला जाणीव आहे. त्यासंदर्भात आम्ही सध्या तपास करत आहोत आणि लवकरच नवीन अपडेट युजर्सना उपलब्ध करून देऊ. युजर्सला आलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे झूमने ट्विटरवर म्हटले आहे. दरम्यान, आउटेज कशामुळे झाले याबद्दल झूमकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

भारतातही मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील सर्वात जास्त युजर्सनी झूम वापरण्यात अडचणी येत असल्याचे डाऊनडिटेक्टरच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. चांगले इंटरनेट कनेक्शन असूनही युजर व्हीडीओ मीटिंगशी कनेक्ट होऊ शकत नाहीयेत.

बीएसएनएलमध्ये व्होडाफोन-आयडियाच्या विलीनीकरणाला विरोध

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या