23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeतंत्रज्ञानट्विटरविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

ट्विटरविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. मात्र ३ महिन्यांची मुदत देऊनही सुचनांची अंमलबजावणी न केल्याने दिल्लीतील एका वकीलाने ट्विटरविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ऍडव्होकेट अमित आचार्य असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. ट्विटरने एक महत्त्वाची सोशल मीडिया कंपनी म्हणून आपली सर्व कार्यकारी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघराज्याने विलंब न करता आयटी नियम २०२१ चा नियम ४ लागू करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

ट्विटरने सरकारच्या नव्या आयटी नियमांवर आक्षेप घेतला आहे. भारतीय वापरकर्त्यांच्या संरक्षणासाठी ते कटिबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आम्ही भारत सरकारच्या नवीन नियमांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करू. परंतु आपल्या सर्वांनी सहकार्याने दृष्टिकोन बाळगणे फार महत्वाचे आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.दुसरीकडे केंद्र सरकारने ट्विटरला सक्त तंबी दिली आहे. ट्विटरने इकडे-तिकडे बोलणे थांबवावे आणि नियमांची अंमलबजावणी करावी. कोणत्याही देशाला कायदे आणि धोरणे बनविण्याचा विशेष अधिकार असतो. ट्विटर हे एक व्यासपीठ आहे आणि भारताच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करू नये. ट्विटर भारताची कायदेशीर व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

फेसबुक,गूगलकडून अनुकूलता
तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर फेसबुक आणि गुगलने त्यासंदर्भात आपली निवेदने दिली आहेत. आयटी नियमांनुसार कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीच्या ऑपरेशन प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी बरीच कामे केली जात आहेत, असे फेसबुकच्यावतीने सांगण्यात आले आहे. कंपनी भारताच्या विधान प्रक्रियेचा पूर्ण आदर करते. वापरकर्त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन कंपनी सरकारचे नियम लागू करेल. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे गुगलच्यावतीने सांगण्यात आले आहे.

कू कडून सूचनांचे पालन
अंतिम मुदत संपण्यापूर्वी सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करणारे कू हे एकमेव व्यासपीठ होते. कूची गोपनीयता धोरण वापर अटी आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांना लागू असलेल्या नियमांच्या आवश््यकता प्रतिबिंबित करते. एवढेच नाही तर कंपनीने त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केल्याचे कु कडून सांगण्यात येत आहे.

योगाच्या मदतीने अनेक देशांची कोरोनावर मात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या