36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeतंत्रज्ञानखासगी कंपन्यांवरही हवी चिनी तंत्रज्ञान वापराला बंदी

खासगी कंपन्यांवरही हवी चिनी तंत्रज्ञान वापराला बंदी

एकमत ऑनलाईन

पुणे : देशभरात सुरू असलेल्या चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या मागणी प्रमाणेच चिनी तंत्रज्ञान वापरावरही  बहिष्कार करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने खासगी दूरसंचार कंपन्यांवरही चिनी तंत्रज्ञान वापरण्याबाबत बंदी आणावी, अशी मागणी बीएसएनएल एम्प्लॉईज्ड युनियनने केली आहे.

लडाख येथे भारत आणि चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या चकमकीनंतर चीनबाबत देशभरात संतापाची लाट आहे. तसेच, चीनला धडा शिकविण्यासाठी देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कारही घालण्याची मागणी होत आहे, देशभर ठिकठिकाणी आंदोलनेही होत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर बीएसएनएलला चिनी तंत्रज्ञान वापर टाळण्यासंबंधिच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. बीएसएनएलतर्फे केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन करण्यात येत आहे. मात्र, त्याचबरोबर अन्य खासगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना सुद्धा चिनी तंत्रज्ञान वापरण्यावर निर्बंध घालावेत, असेही बीएसएनएल एम्प्लॉईज्ड युनिअनने सूचवले आहे.

Read More  आकडा वाढला : बिहार-उत्तरप्रदेशमध्ये आतापर्यंत ११२ जणांचा वीज पडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या