नवी दिल्ली : नव्या गोपनीयता धोरणामुळे व्हॉट्सअॅप वादात सापडले आहे. आम्ही वापरकर्त्यांचे मेसेज वाचत नाही, त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवला जात असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले. मात्र तरीही व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणाबद्दलचा संशय दूर झालेला नाही. त्यातच काल केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपकडे नवे धोरण रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपकडून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपची मालकी फेसबुककडे आहे. नव्या धोरणामुळे व्हॉट्सअॅपकडे असलेला डेटा फेसबुकला दिला जाईल. त्यामुळे गोपनीयतेचा भंग होईल. व्हॉट्स अॅपकडून वापरकर्त्यांचे मेसेज वाचले गेल्याने गोपनीयता जपली जाणार नाही, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यावर आता व्हॉट्सअॅपने खुलासा केला आहे. लोकांच्या मनातला संभ्रम दूर करण्याचे काम सुरू आहे. याबद्दलचे सर्व प्रश्न देण्यास आम्ही तयार आहोत, असे व्हॉट्स अॅपने म्हटले आहे.
गोपनीयता धोरण अपडेट केल्यावर आमच्याकडून फेसबुकसोबत कोणताही डेटा शेअर करणार नाही. पारदर्शकपणा कायम राखणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. नवे पर्याय व्यवसायिकांसाठी आहेत. त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व्यवसायिकांना ग्राहकांना चांगली सुविधा देता यावी, हा हेतू त्यामागे आहे. व्हॉट्सअॅपमधील पर्सनल मेसेज एंड टू एंड एनक्रिप्शनच्या माध्यमातून सुरक्षित आहेत. हे मेसेज व्हॉट्स प, फेसबुकदेखील पाहू शकत नाही. लोकांच्या मनातला संभ्रम, शंका दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची आमची तयारी आहे, असे व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरणात नमूद केले आहे.
भारताची भूटान, मालदिवला लसीची मदत