25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home तंत्रज्ञान रेडमी 9 प्राईम उद्या सादर होणार

रेडमी 9 प्राईम उद्या सादर होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शाओमी ब्रँडच्या रेडमी 9 प्राईम चे सादरीकरण उद्या भारतात होणार आहे. हा फोन ६ ऑगस्टपासून अमेझॉन प्राईम डे मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतातील शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटरवरून या फोनची माहिती दिली आहे.

मागच्या महिन्यात या फोनचे लॉन्चिंग चीनमध्ये झाले. तिथे रेडमी ९ मालिकेतील या फोनमध्ये थोडे सुधारित बदल करून नवीन आवृत्तीत उपलब्ध होणार आहे. या फोनची भारतात १०,००० रुपये किंमत असू शकते. या फोनची रिअलमी सी 11 या फोनशी टक्कर होऊ शकते. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळावर ‘रेडमी ९ प्राईम’ या फोनचे लॉन्चिंग होणार आहे.

शाओमी कंपनीच्या विविध माध्यमातून या फोनचे प्रक्षेपण होणार आहे. तसेच ई-स्टोर आणि दुकानांमध्येही लवकरच हा फोन विक्रीस उपलब्ध होणार आहे. या फोनची स्क्रीन 6. 53 इंच पूर्ण एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच सुविधा असू शकते. याचे रिझोल्युशन १०८०×२३४० पिक्सलमध्ये येऊ शकते.

या फोनमध्ये MediaTek Helio G80 Soc गेमिंग प्रोसेसर आहे. तर ३ रॅम पर्यायी उपलब्ध आहे. १३ मेगापिक्सेल क्वाड कोर रिअर कॅमेरा सह ८+५+२ मेगापिक्सेल कॅमेरे आहेत.. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा असून फोनची बॅटरी 5200 MAh आणि USB Type-C चार्जर तसेच जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे.

Read More  पाकिस्तानी न्यूज चॅनेल DAWN हॅक, स्क्रीनवर तिरंगा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या